
कौतुकास्पद! न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या FIDE महिला जागतिक रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये बुद्धिबळपटू कोनेरू हंपी यांनी ऐतिहासिक खेळी करत दुसऱ्यांदा जागतिक विजेते पदावर आपलं नाव कोरलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तमाम देशवासियांना त्यांचा सार्थ अभिमान आहे. बुद्धिबळासह इतर खेळांत रुची ठेवणाऱ्या युवा खेळाडूंसाठी त्या एक आदर्श आहेत. त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!