स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची धडाकेबाज कारवाई

Spread the love

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची धडाकेबाज कारवाई.

मोटार सायकल चोरणारा चोरटा जेरबंद

८लाख १०हजार च्या १९ मोटार सायकल जप्त १८ गुन्हे उघडकिस.

सांगली- मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी
करणा-या संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. ३१/१२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोना सुशिल मस्के यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली, विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील जुना धामणी रोडला असलेले पलाश बिल्डकॉन या नवीन बांधकामाचे अपार्टमेंट पासून पुढे थोड्या अंतरावर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक इसम बिना नंबर प्लेटची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल सोबत घेवून संशयीत रित्या वावरत आहे.असे दिसुन आले असता,
तयार पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील जुना धामणी रोडला असलेल्या पलाश बिल्डकॉन या नवीन बांधकामाचे अपार्टमेंट पासून पुढे एक इसम हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकलसह मिळून आला.संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमोल संभाजी साबळे वय-४९ वर्षे राहणार-चिंचणी ता-तासगाव जि-सांगली असे असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील यांनी त्याची चौकशी करत असताना समजले की काही दिवसापूर्वी भोमाज हॉस्पीटल, मिरज येथून सदरची मोटार सायकल चोरी केली होती. ती मोटर सायकल विक्री करण्यासाठी तो जुना धामणी रोड येथे आला असल्याची कबूली त्याने दिली. त्यास आणखी विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने सांगितले की, त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणावरुन आणखी काही मोटर सायकली चोरी केलेल्या आहेत. त्या मोटरसायकली त्याने त्यांचा मित्र सागर उत्तम पाटील राहणार-मेघराजनगर, चिंचणी ता-तासगाव जि-सांगली यांचे घरासमोरील पत्र्याचे मोकळया शेडमध्ये काळया ताडपत्रीमध्ये अर्धवट झाकून लावलेल्या आहेत.सांगण्याप्रमाणे तेथे चौकशी केल्यावर एकूण १९ मोटार सायकली ताब्यात घेण्यात आल्या.सदरच्या मिळालेल्या मोटार सायकली बाबद पोलीस स्टेशनचे क्राईम अभिलेख पडताळले असता, सांगली जिल्हयातील महात्मा गांधी चौक, विश्रामबाग, मिरज शहर, संजयनगर तसेच कोल्हापूर जिल्हयातील गावभाग इचलकरंजी, शाहूपूरी, शिवाजीनगर पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून हॉस्पीटल पार्कीग, गर्दीची ठिकाणे, अपार्टमेंट पार्कीग अशा ठिकाणांहून मोटार सायकली चोरीत असे. स्था. गु. शाखा, सांगली तसेच जिल्हयातील पोलीस ठाणेकडून वेगवेगळी पथके वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नेमण्यात आलेली आहेत. नागरिकांना सांगली पोलीस प्रशासना कडून अवाहन करण्यात येते की, आपल्या मोटार सायकलचे जुने लॉक खराब झाले असल्यास ते वेळेवर बदलून घ्यावे तसेच मोटार सायकलला दुसरे लॉक लावलेस वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध घालता येईल. आपले वाहनास जी.पी.एस. यंत्रणा बसवून घेण्यात यावी.

(सतिश शिंदे) पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *