सावज टिपणाऱ्या नजरा…

Spread the love

सावज टिपणाऱ्या नजरा !
……………………………………..

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.


  1. ………………………………………..

सावज टिपणाऱ्या नजरा ह्या,
इतक्या बेमालूमपणे निगरगट्ट असतात की,टिपणाऱ्या च्या आयुष्याची वाताहत झालेली असते.त्याच्या आयुष्याची उध्वस्त झालेली नाव,त्याचा तो काळवंडलेला चेहरा,राकट झालेले त्याचे मन,पुन्हा आयुष्याच्या नवीन प्रेमाच्या सावली कडे देखील बघणार नाही याची खात्री त्याला झालेली असते.

मात्र,यथावकाश परिस्थितीने त्याला जिवंत ठेवला असल्यास,कमीत कमी
तो आपले दुःख वेदना व्यक्त तरी करू शकतो. मात्र,अपवादात्मक परिस्थिती वगळता,अनेक जणांची नाव नदी किनाऱ्या पलीकडे डुबलेलीच दिसते.

कोल्हापूर शहरातील एका स्वर्गीय तत्कालीन आमदारांनी,शहराच्या मध्यवर्ती भागात मध्ये उभारलेले ते महाविद्यालय,थोर समाज सुधारक
यांच्या नावे असलेले ते कॉलेज अनेक गरीब व मध्यमवर्गीयांची मुले या महाविद्यालयात शिकण्यासाठी खूप
दूरून येतात.

अगदी अलीकडच्या काही वर्षापूर्वी,घडलेली घटना.
या महाविद्यालयाच्या प्राध्यापक महोदयाने त्याच महाविद्यालयात
शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला सावज म्हणून टिपले.

तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं!

म्हणत या तरुणीने,आपण सहज रित्या टिपले गेलोय याचं भान देखील न ठेवता,सदरच्या प्राध्यापक
महोदया बरोबर, सह्याद्रीच्या पर्वतरांगा घाट माथ्यावरती असणाऱ्या
ठिकाणी,आपल्या सहकारी प्राध्यापक मित्राची कार घेऊन,दोघा जनानी रंगीला मुक्काम ठोकला.सकाळी पहाटे पुन्हा कॉलेज वरती जायचं असल्याने पहाटे पाचच्या सुमारास,नागमोडी वळणाच्या घाटमाथ्यावरून सह्याद्रीच्या पर्वतरांगा अंधारातून बघत,गगनबावडा कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील,
पळसंबे तालुका गगनबावडा येथील रस्त्यालगत असणार्‍या कॅन्टीन शेजारी एसटी महामंडळाच्या बांधलेल्या जुन्या शेडला, अर्थात बस थांबण्याचे ठिकाणी भिंतीवरती, पहाटेचा अंधार समयी भरधाव वेगाने प्राध्यापक महोदयांनी चालवलेली ती कार येऊन थडकली.
रंगेल अशा प्राध्यापक महोदय याचा,
व सावज म्हणून टिपली गेलेल्या,
त्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. जाग्यावर ची घटना अतिशय हळहळ व्यक्त करणारी होती.

मात्र अनैतिक संबंधाचा फुगाच फुटल्याने, गाडीत मद्याच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या असल्याने,प्राध्यापक महोदयाच्या विषयी,संपूर्ण जिल्हाभर,चर्चा रंगली होती.
त्यातल्या त्यात सदरच्या,
सहकारी प्राध्यापकाची कार गाडी घेतली होती.त्याला सुद्धा शरमेने मान खाली घालावयाची पाळी आली होती.

ज्या शाळेत विद्यार्थ्यां वरती ज्ञानार्जन करावयाची जबाबदारी प्राध्यापकाची होती,महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्याऐवजी,त्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनीला सावज म्हणून टिपल्याने,दोघांचाही अविचारी अविवेकी बुद्धीमुळे हकनाक बळी गेला,तो कायमचा!

अशाच एका प्रकरणांमध्ये,पन्हाळा तालुक्यातील आडवळणी खोरे म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एका,नदी किनाऱ्यालगतच्या गावाशेजारील घडलेली घटना!

अनैतिक संबंधातून एका महिलेने आपल्याच गावातील एका,
शेतकऱ्याला सावज म्हणून टिपले,प्रेमाच्या आणाभाका,वाढू लागल्याने,सावज म्हणून टिपणाऱ्या त्या महिलेच्या पतीचा अडसर होऊ लागल्याने, अनैतिक संबंधाच्या आणाभाका घेणाऱ्या त्या प्रियकरासोबत घेऊन,आपल्या नवर्याला शेतवाडी मध्ये बोलून घेऊन,दोघांनी मिळून संयुक्त खून केला होता.व प्रेताची परस्पर विल्हेवाट लावली होती.सदरच्या घटनेचा अधिक तपास लागला असता गुन्ह्याची उकल झाल्यानंतर,त्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती, यामध्ये खून करणार या महिलेने स्वतःहून केलेला आहे अशा पद्धतीचा कबुलीजबाब देऊन आपल्या प्रियकराचा बचाव केला होता.
आज घडीला तिचा प्रियकर तिच्या गावातून रिकामटेकडा फिरत आहे.

त्याच गावातील एका कुटुंबातील पतीने,अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून,परखंदळे तालुका पन्हाळा येथील गोटे नदीच्या पुलावर ती,नदीच्या दरडीच्या दोन्ही बाजूने पावसाळ्यात पाणी वाहत असताना, नदी भरून वाहणाऱ्या नदीच्या पुलावरून पत्नीला ढकलून देण्याचे कपटकारस्थान पतीच्या मनात सुरू असताना,त्याच्या बायकोला त्याने ढकलन्या करता हात पुढे केला असता,बेसावध असणाऱ्या त्या पत्नीने अचानक सावध होत, आपल्या नवऱ्याच्या गळ्यातील शर्टाला,घट्ट पकडल्याने दोघांचाही तोल भरलेल्या नदीत गेला.सावज टिपणारा ही टिपणारी च्या सोबत गेला.सदरच्या जोडप्याचे वाहून गेलेले प्रेत साधारणता महिन्यांनी नदीकिनारी सापडले होते.

इतिहासाच्या नकाशा वरती पन्हाळगडाचे असलेले महत्त्व पाहता,गडा शेजारच्या एका लोकसंख्येने जास्त असणाऱ्या पोलीस स्टेशनातील,एका हवालदारवरती दोन महिला पोलिस कॉन्स्टेबलने एकाच वेळी प्रेम प्रकरण केल्यामुळे,त्यात त्या हवालदाराच्या,पत्नीची जास्तीची भर पडल्याने,प्रेमाच्या या त्रिकोणाच्या जाळ्यात अडकलेल्या त्या पोलीस हवालदाराने शेवटी आपल्या राहते घरी गळ्याला फास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे.

एक एक से बढकर दो आणि त्यात पत्नी प्रेमाची,न सुटणारी उकल याला वैतागून पोलीस हवालदाराने केलेली आत्महत्या,
सावज टिपणाऱ्या नजरेला टिपली गेल्याने,त्या हवालदाराला स्वतःहून स्वतःचा बळी द्यायची वेळ आली.

अशा सावज टिपणाऱ्या नजरा,
भ्रमिष्ट असतात.
व दारुड्या नसताना दारुड्याच्या धुंदी सारख्या वावरणाऱ्या असतात,जुगारी नसताना कोणत्याही वस्तूची विक्री करण्याची,घांनवठ ठेवण्याची,वा यासाठी खाजगी सावकाराच्या कडून हव्या त्या व्याजाच्या बोली वरती पैसे घ्यायचे अशा पद्धतीच्या, कोणतीही कसर टिपल्या जाणाऱ्या नजरा मागे ठेवत नाहीत.
प्रेमाचं प्राथमिक आकर्षण असणे स्वाभाविक आहे.आणि मानवी जीवनामध्ये,याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मात्र,आपल्या रक्ताची जोडलेली नाती तोडून वा त्याचा खुन करून वा त्यांच्याशी बैमानी करून,अशा सावज,टिपणाऱ्या नजरा अनेक ठिकाणी फिरत असतात.
गाव गाड्या वरच्या एसटीच्या गर्दीत,तालुका तहसीलच्या कार्यालयाच्या समोर,पोलीस स्टेशनचे दारात,
एसटी महामंडळाच्या बाकड्यावरती,
रेल्वे स्टेशनच्या फलाटावरती, श्रीमंत,अध्यात्मिक साधू-संत यांच्या आश्रमातील,प्रवचनाच्या गर्दीच्या ठिकाणी,कुण्यातरी मोठ्या श्रीमंताच्या लग्न वऱ्हाडाच्या गर्दीत,रक्ताचे नात्याला फाट्यावर मारत अशा सावज टीपणाऱ्या नजरा टिपून घेणाऱ्यांना हुडकत असतात.
ते फक्त आणि फक्त सावज टिपणाऱ्या नजरा म्हणून!
………………………………………….

लेखक-:श्री तानाजी सखाराम कांबळे.
मुंबई(8080532937)

खालील छायाचित्र जुन्या मराठी चित्रपटातील शलाका या अभिनेत्रीचे संग्रहित छायाचित्र आहे.
ठकास महाठक या चित्रपटातील सिनेअभिनेत्री.
……………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *