
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे निधन झाले आहे.(२६ सप्टेंबर, १९३२ – २६ डिसेंबर, २०२४) हे २२ मे २००४ पासून २६ मे २०१४पर्यन्त भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.