सांगली जिह्याच्या विकासाचा महामेरु माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे…..

Spread the love

सांगली जिह्याच्या विकासाचा महामेरु माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे…..

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- मिरज प्रतिनिधी :

सांगली जिल्ह्यात प्रथमच कमळ फुलवून त्यानंतर सलग पाचवेळा चढत्या मताधिक्याने विजयी झालेले मिरजेचे विद्यमान आमदार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचा आज १ जून रोजी वाढदिवस ……. त्यानिमित्ताने ……

सेवाभावी वृत्ती आणि कुशल संघटन याचा वारसा आणि दूरदृष्टी लाभलेलं नेतृत्व म्हणून राज्याचे माजी कामगार मंत्री तथा सांगली जिह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांचा नामोल्लेख करावा लागेल. शासन भाजपाचे असो किंवा महाआघाडीचे, मिरज विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी ते नेहमीच कटीबध्द राहिले आहेत. आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणून मतदारसंघ समस्यामुक्त करण्याचा घ्यास त्यांनी घेतला व तो यशस्विरित्या पूर्णही करून दाखविला. केवळ मतदारसंघातच नव्हे तर पालकमंत्री या नात्याने संपूर्ण जिल्ह्यात विकासकामांचे डोंगर उभारून त्यांनी जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व केले. तीन वर्षांपूर्वी आ. खाडे यांनी कोरोनातही रुग्णांना लक्षवेधी साथ दिली व सर्वसामान्य जनतेचे ते आधारवड बनले. मतदार संघातील समस्यांवर लक्ष केंद्रीत करीत असताना गरजूंना दातृत्वाचाही हात त्यांनी दिला.

मिरज विधानसभा मतदार संघाला आत्तापर्यंत अनेक आमदार लाभले. पण, तळागाळातील जनतेच्या भावना विचारात घेऊन त्यांच्या समस्यांचा निपटारा करण्यात पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांचेच नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सर्वसामान्यांना भेडसाविणाऱया रस्ते, शेती आणि पिण्याचे पाणी, ड्रेनेज, आरोग्य सुविधांना त्यांनी नेहमीच प्रथम प्राधान्य दिले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतून गेल्या काही वर्षात कोटय़ावधीचा निधी खेचून आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत. म्हैसाळ योजना बारमाही कार्यान्वित व्हावी, यासाठीही त्यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला. अनेकवेळा त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने आज मतदार संघातील ग्रामीण भाग सुजलाम सुफलामतेच्या मार्गावर आहे. हे त्यांच्याच यशाचे गमक आहे.

आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी केवळ विकास कामावर भर न देता पक्षीय पातळीवरही भरीव कामगिरी करुन दाखवत राज्यातील भाजपाच्या नेत्यांचे लक्ष वेधून घेतले. मिरज विधानसभा मतदार संघावर आपले वर्चस्व सिध्द करतानाच त्यांनी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपाचे कमळ फुलवून या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्था यशस्वीपणे चालवून दाखविल्या. या संस्थांमध्ये आजही भाजपाचे प्राबल्य असण्यात डॉ. सुरेश (भाऊ) खाडे याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या रुपाने एक अभ्यासू, समर्थ आणि सक्षम नेतृत्व जिह्यात भाजपाला मिळाले आहे. प्रलंबित प्रश्नासाठी त्यांच्यासारख्या धडपडय़ा आणि अभ्यासू लोकप्रतिनिधीची गरज होती. डॉ. सुरेश (भाऊ) खाडेनी ती निश्चितच पूर्ण केली आहे. राज्यात पक्षाची सत्ता असो वा नसो त्यांनी मतदार संघाच्या विकासासाठी अव्याहत पाठपुरावा केला.

आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या अशा अनेक कामांची भाजपा नेत्यांनी दखल घेऊन त्यांच्यावर राज्याच्या कामगारमंत्री पदाची आणि जिह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील सोपवली होती. मिरज विधानसभा मतदार संघाचा कायापालट करण्यात यशस्वी ठरलेले हे नेतृत्व सर्वसामान्यांच्या हृदयात बसले आहे.. एक कामगार असलेले डॉ. सुरेश (भाऊ) खाडे राज्याचे कामगारमंत्री झाले होते. त्यामुळे कामगारांच्या समस्यांची त्यांना जाणीव असल्याने त्यादृष्टीने त्यांची विकास कामांची व्यूहरचना सुरू केली. प्रत्येक जिह्यात कामगार भवन आणि कामगारांसाठी रुग्णालय उभारण्याचा तयानी त्यांच्या कार्यकाळात प्रामाणिक प्रयत्न केला. त्या दृष्टीने निधीही उपलब्ध करुन दिला. कामगारमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्यावर जिह्याच्या पालकमंत्र्यांचीही जबाबदारी दिली होती. हे धनुष्यबाण देखील त्यांनी यशस्वीपणे पेलून दाखविले. मतदार संघाबरोबर जिह्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने उपलब्ध निधीचा योग्य वापर सुरु केला. त्याचा फायदाही जिल्ह्याला झाल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या कालावधीत डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी शहरातील शासकीय रुग्णालयाला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह आवश्यक बेड उपलब्ध करुन दिले होते. कोरोनाचा उद्रेक विचारात घेऊन त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करुन आवश्यक असणाऱया गोष्टींची पूर्तता करण्यास प्रथम प्राधान्य दिले होते. मिरज शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला होता. महापालिकेतील सत्ताधाऱयांना विश्वासात घेऊन या रस्त्यांसाठी त्यांनी कोटय़ावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. भविष्यात देखील शहरातील रस्त्यांना कधीही निधी कमी पडणार नाही, अशी हमीच त्यांनी मतदारांना दिली आहे. शहरातील प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा प्रश्नही त्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊन मार्गी लावला आहे.

शहरातील रस्त्यांबरोबर भाजी मंडई, तालुका क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, वारकरी भवन, बालगंधर्व नाट्यगृह सुशोभीकरण, लक्ष्मी मार्केट इमारत डागडुजी अशा अनेक समस्यांवर आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊन मात करण्यात आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यशस्वी ठरले आहेत. महापालिकेच्या अस्तित्वापासून अनेकांनी शहरातील याच प्रश्नावर राजकारण केले. पण प्रत्यक्षात कामे मार्गी लावण्याची किमया आमदार खाडे यांनी साध्य करुन दाखविली आहे. यापैकी बहुतांशी कामे सध्या पूर्ण झाली असून, काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. भाजी मंडईच्या उभारणीने शहरातील रस्त्यावरचा भाजी बाजाराला मोठा आधार मिळणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनातून सर्वाधिक निधी मिरज मतदार संघाला मिळवून देण्यामध्ये डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यशस्वी ठरले आहेत. त्यामध्ये दलित वस्ती, रस्ते, गटारी, अंगणवाडय़ा, पाणी पुरवठा योजना अशा एक ना अनेक कामांचा समावेश आहे. याशिवाय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, आरगेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिस्मारक, मिरासाहेब दर्गा व कृष्णाघाट मार्कंडेश्वर मंदिराचा विकास, बोलवाड येथील कै. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान, राज्य वन पर्यटन मधून दंडोबा विकास, आरग प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत, वैद्यकीय सहाय्यता निधी, अपघात मृत्यू निधी, राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान, शिपूर गावातील पुल, शासकीय तंत्रनिकेतन कार्यशाळा, व मुलींचे वसतीगृह, शासकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वसतीगृह, शहरातील सुधारीत ड्रेनेज योजना अशा अनेक कामांसाठी कोटय़ावधी रुपयांचा निधी मतदार संघात आणण्यात डॉ. सुरेश (भाऊ) खाडेना यश आले आहे. मिरज मतदारसंघातील ग्रामीण भागाचा तर त्यांनी पूर्णपणे कायापालटच करून टाकला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तथाकथित विरोधकांचे त्यांनी समूळ उच्चाटन करून भाजपाची पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत.

मिरजेसारख्या काँग्रेस, समाजवादी आणि डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या बालेकिल्ल्यात भाजपाचे ‘कमळ’ फुलेल, असे कधी वाटले नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, शिवसेना या आणि अशा हिंदूत्वादी विचारसरणीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या पिढय़ा मिरजेत आपल्या विचारांचा आमदार निवडून यावा, असे स्वप्न बघत काळाच्या पडद्याआड गेल्या. मात्र पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्याची किमया डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी चार वेळा प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन साधली. केवळ आपल्या विजयावर ते कधीच समाधानी राहिले नाहीत. याशिवाय त्यांनी केलेल्या कामामुळेच महापालिका तसेच मिरज तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी घवघवीत यश मिळण्याबरोबर मिरज पंचायत समितीही भाजपाच्या ताब्यात येण्यास डॉ. सुरेश (भाऊ) खाडेचा सिंहाचा वाटा होता.

डॉ. सुरेश (भाऊ) खाडेचे मिरज येथील संपर्क कार्यालय नेहमीच कार्यकर्त्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या वर्दळीने गजबलेले असते. येथे आलेल्या गोरगरीब आणि गरजू नागरिकांना हाच माणूस आपली समस्या दूर करेल, असा विश्वास वाटतो. आपल्याकडे आलेला गरजू, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असो वा कोणत्याही राजकीय पक्षाचा, आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे त्यांची समस्या स्वत लक्षपूर्वक जाणून घेवून मार्गी लावताना दिसतात. त्यामुळे मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती भाऊंकडून काम पूर्ण होणारच, या विश्वासाने कार्यालयात येताना दिसतो. सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणारा, धावून जाणारा असा मुत्सूद्दी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी सुरेशभाऊंच्या रुपाने मिरज मतदारसंघास लाभला आहे. हे जनतेचे भाग्य आहे.

पाच वर्षे जत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून त्यानंतर सलग चार वेळा मिरज मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आ. डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी अत्यंत विश्वासू, अभ्यासू, तोलामोलाचे आणि प्रामाणिकपणे अहोरात्र काम करणारे कार्यकर्ते तयार केले आहेत. “भाऊंचा शब्द अखेरचा” मानणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची फौज त्यांच्याकडे आहे. कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी करणारे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे ” भाऊ” हे कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहे.

आ. डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या या अफाट कर्तृत्वात व अखंडपणे सर्वसामान्य जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी झटण्याच्या कार्यात भाऊंच्या सर्व कुटुंबियांचेही मोलाचे योगदान आहे. भाऊंच्या सुविद्य पत्नी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या “मावशी ” सौ. सुमनताई खाडे आणि भाऊंचे सुपुत्र व सर्व कार्यकर्त्यांचे ” दादा ” प्रशांतदादा खाडे यांचा भाऊंच्या यशात मोठा वाटा आहे. सौ. सुमनताई खाडे या तर संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढत असतात व गोरगरीब महिला, ग्रामीण भागातील कुटुंबियांशी सातत्याने संपर्कात असतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात व दूरही करतात. भाऊंच्या रथाचे एक चाक सौ. सुमनताई यांनी समर्थपणे सांभाळले आहे. यात तिळमात्र शंका नाही. सौ.सुमनताई (मावशी) यांचाही १ जून हाच वाढदिवस असल्याने मतदारसंघातील तमाम कार्यकर्ते भाऊ व मावशीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात एकत्रितपणे साजरा करतात.

आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे व सौ. सुमनताई खाडे याना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *