करूळ घाटात कंटेनरला आग… वाहतूक काही काळ विस्कळीत…

Spread the love

करूळ घाटात कंटेनरला आग.
वाहतूक काही काळ विस्कळीत

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
गगनबावडा / प्रदिप गुरव

गगनबावड्यापासून चार कि.मी.अंतरावर कोल्हापूर तळेरे या राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात कोल्हापूर च्या दिशेने निघालेल्या कंटेनर ला अचानक आग लागून कंटेनर ची चालक केबीन पुर्णतः जळून खाक झाला. याबाबतची अधिक माहिती अशी की.कोकणातून करुळ घाट मार्गे कोल्हापूर च्या दिशेने जेसीबी मशीन घेऊन निघालेला कंटेनर आज बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास करुळ घाटातील एका वळणावर आला असता कंटेनर च्या चालकाला केबीनजवळून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.चालकाने तात्काळ कंटेनर थांबवून पाहीले असता चालकाला आग लागल्याचे निदर्शनास आले. मात्र या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले काही वेळात महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेदाराने पाणी टँकर पाठविल्यानंतर आग विझवण्यात आली.

मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने कंटेनर ची चालक केबीन जळून गेली.या आगीचे वृत्त समजताच वैभववाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.व कंटेनर ला लागलेल्या आगीमुळे घाटात खोळंबलेली वाहतूक काही वेळानंतर पुर्ववत सुरू केली. या आगीमुळे काही काळ घाटातील वाहतूक ठप्प व विस्कळीत झाली होती.यापूर्वी 2मे रोजी घाटात अचानक लागलेल्या आगीमुळे कार जळून खाक झाली होती.त्यामुळे करूळ घाटात महिनाभरात घडलेली ही दुसरी घटना आहे.सुदैवाने दोन्ही वेळा कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *