आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत स्वयंरोजगार मेळावा : युवा नेते मयूर निकम व युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर यांच्या मार्फत आयोजन.

Spread the love

आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत स्वयंरोजगार मेळावा : युवा नेते मयूर निकम व युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर यांच्या मार्फत आयोजन

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
मिरज प्रतिनिधी:

         माजी पालकमंत्री, आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत स्वयंरोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आलं आहे. युवा नेते मयूर शेठ निकम व भाजपाच्या युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर यांनी मिरजेतील आळतेकर हॉल येथे दिनांक 2 जून 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडी उद्योग भवन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांच्यासाठी या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केला आहे. आमदार सुरेश भाऊ खाडे आणि अन्य मान्यवर या स्वयंरोजगार मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते मयूर शेठ निकम व भाजपाच्या युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर यांनी केले आहे. 


    नवीन उद्योग रोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बँकेकडून कर्ज उपलब्ध होणार आहे, शासनाकडून 15 टक्के ते 35 टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे, उद्योग सेवा आणि व्यापारासाठी खुली संधी निर्माण झाली आहे. महिला आणि अनुसूचित जाती जमाती साठी विषय सवलत आहे. या योजनेअंतर्गत 5000 पासून ते 50 लाखापर्यंत कर्ज व अनुदान उपलब्ध होते. तरी इच्छुक उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला सोबत घेऊन या स्वयंरोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    सभासदासाठी अत्यल्प कागदपत्रांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र सीएमईजीपी अंतर्गत ऑफलाइन नोंदणी करून जो अर्ज उद्योगावर मार्फत निशुल्क ऑनलाईन अपलोड करण्यात येणार आहे. उद्योजकता विकास परिचय कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज प्रकरण यावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *