स्व. आर. आर. आबा पाटील समृद्ध गाव योजनेअंतर्गत धोंडेवाडी येथे जिल्हा परिषद प्रशासकीय टीमचे जल्लोषात स्वागत.

Spread the love

स्व. आर. आर. आबा पाटील समृद्ध गाव योजनेअंतर्गत धोंडेवाडी येथे जिल्हा परिषद प्रशासकीय टीमचे जल्लोषात स्वागत

दैनिक वृत्तवेग.प्रतिनिधी-धोंडेवाडी

स्वर्गीय आर. आर. आबा पाटील समृद्ध गाव योजनेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषद प्रशासकीय पथकाचे धोंडेवाडी गावात सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ साहेब व त्यांच्या टीमचे धोंडेवाडी गावचे विद्यमान सरपंच बंडू गुरव साहेब व ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थ्यांनी हलगीच्या आवाजात, लेझीम खेळ सादर करत पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ साहेब यांचा बैलगाडीतून संपूर्ण गावातून फेरफटका मारण्यात आला.याप्रसंगी बोलताना सूर्यकांत भुजबळ साहेब यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच सरपंच बंडू गुरव साहेब व ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला दिला. धोंडेवाडी गाव निश्चितच या स्पर्धेत प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गावाची पाहणी केल्यानंतर प्रशासकीय पथक गावातील स्वच्छता, विकासकामे व एकोप्याचे वातावरण पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट, सर्व पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी कर्तव्यदक्ष सरपंच बंडू गुरव यांनी धोंडेवाडी गावाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे तपासणी पथक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *