
चिरंजीव ऋतुराज बनसोडे यांचा चौथा वाढदिवस हौसाई वृद्धाश्रमात साजरा
प्रतिनिधी | करोली (एम)
खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रम येथे मा. राजकुमार बनसोडे करोली (एम) यांचे चिरंजीव कु. ऋतुराज राजकुमार बनसोडे यांच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृद्धाश्रमासाठी धान्यरूपात विविध साहित्य भेट देण्यात आले तसेच वृद्धांना लाडू वाटप करण्यात आले.या प्रसंगी हौसाई वृद्धाश्रमातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत केक कापून ऋतुराजचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक संदेश भाऊ भंडारे यांनी ऋतुराजला भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास अधीक्षक रेखा माळी, निलेश नवघरे, चैताली तातुगडे, माधुरी मुळीक, नलिनी कांबळे, विजय लांडगे तसेच पूजा लोंढे यांनी वाढदिवसाचे गाणे गाऊन वातावरण आनंदी केले.






वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी ऋतुराजला भरभरून आशीर्वाद दिले.कार्यक्रमाच्या शेवटी मा. राजकुमार बनसोडे यांनी संस्थेचे, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.
