वारणा नदी तीरावरील 15 कोटीच्या”सावकारी” वर डल्ला!

Spread the love

सांगली ते कोल्हापूरातील सावकारी चर्चेत.

वारणा नदी तीरावरील 15 कोटीच्या “सावकारी” वर डल्ला!

सांगली ते कोल्हापूरातील सावकारी चर्चेत.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क क्राईम स्पेशल मुख्य-संपादक गणेश वायदंडे.

—————————————————————————

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

—————————————————————————

आमच्या बातम्या पाहण्यासाठी दैनिक वृत्तवेग न्युज नेटवर्क या प्रथम क्रमांकाच्या न्यूज वेब पोर्टल www.vruttvegnews.com website या आमच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या…

—————————————————————————

महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेच्या साठमारीत नेहमीच लक्षवेधी ठरलेल्या पश्चिम महाराष्ट्रातूनहिरव्यागार साखरेच्या ऊस पट्ट्यातील कोल्हापूरहा जिल्हा सर्वाधिक श्रीमंत असणारा मुंबई पुण्यानंतरचा मेट्रो सिटी म्हणून ओळखला जातो.कधीकाळी उघड्या जीपमधून [मिशीला तूप] लावूनवाड्यावरून शेताच्या मळ्या पर्यंत फिरणारी इथली [पाटीलकी]बदलत्या काळात सुपरफास्ट मर्सिडीजऑडी पर्यंत पोचली आहे.तर एकाच तारणावरतीतीन-तीन वेळा [कर्ज] देणारी कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी व साखरेच्या हिरव्यागार पट्ट्यालासभासदांचा [जिव्हाळा] जोपासणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच [वादातीत]चर्चेलाराहिली आहे.येथील वारणा नदी तीरावरून फिरणारी,तरुण वयातील सावकारी ने,कधीकाळी मा.आमदार महादेवराव महाडिक अरुण नरके,आमदार पी.एन.पाटील या[म.न.पा.]अशा कोल्हापूर महानगरपालिकेला असलेल्या आघाडीच्या नगरसेवकांचा[ बल्ल्या पाडण्यासाठी] घोडेबाजारवरती 35 लाखाची सावकारी उधळलेल्याची कबुली गेल्यावर्षी दस्तुरखुद्द वारणा नदी तीरावरच्या सावकार याणि जाहीर पणे देत दिलगिरी व्यक्त केली होती.[पश्चाताप व्यक्त केला होता.]पन्हाळगडाच्या पायथ्याशी गेली पंचवीस वर्षे इथली आमदारकी,माजी आमदार दिवंगत कोडोली चे सुपुत्र यशवंत एकनाथ पाटील यांनी एक-हाती सांभाळली होती काँग्रेस पक्षातून.दिवंगत काँग्रेसचे आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या पश्चात,वारणा नदी तीरावरील सहकार,राजकारण महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेच्या सारीपाटावर मध्ये ढवळून निघाले होते.जिल्ह्याचे नेतृत्व करण्याच्या अतिमहत्त्वाकांक्षीधारणे पासून,पस्तीस लाखाच्या सावकारीच्यावाटमारी पर्यंत,ते 15 कोटीच्या रकमेवरती [बेनामी]डल्ला मारेपर्यंत वारणा नदी तीरावरून संथपणे वाहत जाणारे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील तीन नद्यांचा संगम असणाऱ्या,कृष्णा कोयनेच्या नदीच्या घाटापर्यंत[ सर्वाधिक पाणी] सुमारे पाच वर्षांपूर्वी खूपच गढूळ झाले होते.आणि वारणा नदीतीरावरील पंधरा कोटीच्या चोरीप्रकरणी इथली सावकारी चर्चेत आली होती.चोरीला गेलेल्या सराईत गुन्हेगार मुल्ला याने तीन कोटी रुपये चोरल्याचे कबूल केले होते.मात्र हळूहळू तो आकडा नऊ कोटी वरून पंधरा कोटी पर्यंत येऊन ठेपला होता.त्या पैशावरती दावा सरतेशेवटी कोल्हापुरातील बांधकाम व्यवसायिक श्री.झुंजारराव सरनोबत यांनी दाखवला.मात्र पडद्या पाठीमागची संशयाची उरुळी अद्याप देखील कायम राहिलेले आहे.या प्रकरणात सांगली पोलीस मुख्यालयातील एका निरीक्षकासह एक फौजदार व आठ पोलीस कॉन्स्टेबलयांना अटकेला सामोरे जावे लागले होते.आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या वारणा चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी मुल्ला याचा सांगली येथील गणेश नगर येथे,अज्ञात गुन्हेगारांनी भर दिवसा हत्या केली आहे.कधीकाळी याच वारणा नदी तीरावर ती वारणेचा वाघ नावाचा मराठी प्रसिद्ध चित्रपट लोकप्रिय झाला होता.भावा बहिणीच्या अतूट नात यावरती सत्तू नावाच्या डाकूला या चित्रपटात देवाची उपमा देण्यात आली होती.सत्तू धर्माचा भाऊ माझा!सत्तू डोंगरीचा राजा !या लोकप्रिय गाण्याचे शूटिंग याच वारणा नदीच्या संपूर्ण तीरावरती करण्यात आलेले आहे.मात्र चित्रपटातील सत्तू हा डाकू वगळता,या वारणा नदीच्या तीरावरील चोरी प्रकरणातील रेकॉर्ड वरचा सराईत गुन्हेगार मुल्ला,आणि त्याच्या भोवती फिरणारे संपूर्ण यंत्रणा याच्यावरती मराठी चित्रपटांमध्ये नक्कीच एखादी स्टोरी होऊ शकते.ठळक व लक्षवेधी मुद्दे.लुटीतील १५ कोटी रुपयांची रक्कम जी. डी. पाटील यांची असल्याचा दावा विजयसिंह जाधव यांनी केला आहे.पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ धनवट यांच्यासह एक सहायक पोलिस निरीक्षक, एक सहायक फौजदारासह नऊ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.सीआयडीने मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला, सांगली एलसीबीचे निलंबित निरीक्षक विश्वनाथ घनवट याच्यासह सात जणांना केली अटक.चोरी झालेल्या पैशावर ती मालकीहक्क सांगणारे बांधकाम व्यवसायिक श्री.झुंजारराव सरनोबत यांची अर्थात [इन्फोसिस डायरेक्टर]विशेष सक्तवसुली महासंचालनालय,यांचे कार्यालयाकडून चौकशीकरण्यात आली होती.

—————————————————————————

वारणा नदी ही सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे.या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर समुद्रसपाटीपासून ९१४ मीटर उंचीच्या प्रदेशात होतो. वारणा नदी सुरुवातीला वायव्येकडून आग्नेयेकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.वारणा नदी ही सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सुमारे दीड किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे कृष्णेला मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मीटर रुंद आहे.कडवी व मोरणा या वारणेच्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सुमारे ७०० मीटर उंचीच्या प्रदेशात होतो.नेमके प्रकरण काय आहे?

—————————————————————————

मिरजेतील मासे विक्रेता मैनुद्दीन मुल्ला याने वारणा शिक्षण संस्थेच्या कार्यालयातून तीन कोटी रुपये चोरल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मैनुद्दीनने ही कबुली दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील बिल्डर झुंजार सरनोबत यांची ही रक्कम असल्याचे तपासात समोर आले आहे.मात्र, पोलिसांनी सांगेपर्यंत सरनोबत यांना या रकमेची चोरी झाल्याचे माहिती नव्हते हे विशेष.मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले गावचा असलेला मैनुद्दीन याच्या मिरजेतील घरातून १२ मार्चला ३ कोटी ७ लाख ६३ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले होते. तसेच त्याच्याकडील दोन नव्या बुलेटही जप्त करण्यात आल्या होत्या. मैनुद्दीनकडे एवढी रक्कम कोठून आली, हा पोलिसांपुढे प्रश्न होता.तपासादरम्यान त्याने ही रक्कम आपण चोरल्याचे सांगितले होते. मात्र, ती कोठून चोरली, याची माहिती दिली नव्हती. पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी मैनुद्दीनकडून ही माहिती काढून घेतली. मैनुद्दीन हा वाहन चालक म्हणून काम करायचा. त्याचे मूळ गाव जाखले हे वारणानगरपासून जवळच आहे. त्यामुळे वारणा उद्योग समूहाशी संबंधित संस्थांच्या वाहनांचा चालक म्हणूनही त्याने काम केले आहे. वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या इमारतीच्या स्टोअर रूममध्ये काही रक्कम असल्याची टीप त्याला मिळाली होती. त्यानुसार मैनुद्दीनने परप्रांतीय साथीदाराच्या मदतीने आठ मार्चला स्टोअर रूमचे कुलूप तोडून भरदिवसा पैशांची बॅग पळवली होती. साथीदाराला काही रक्कम दिली आणि उर्वरित रक्कम घेऊन तो मिरजेतील बेथेलहेमनगरातील सासुरवाडीत आला. ही रक्कम कोणाची आणि किती आहे, तपासादरम्यान त्याने ही रक्कम वारणानगर येथून चोरल्याचे सांगितल्यानंतर तिथे जाऊन तपासणी केली असता पोलिसांना तिथे आणखी रक्कम आढळली. ही खोली आशुतोष पाटील यांची होती. पाटील यांचे साडू कोल्हापुरातील बिल्डर झुंजार सरनोबत यांनी परगावी जाण्यापूर्वी ही रक्कम ठेवायला दिली होती. आशुतोष यांनी ती वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या इमारतीतील स्टोअर रूममध्ये ठेवली होती. ती मैनुद्दीनने चोरली.पोलिसांच्या छाप्यात सव्वा कोटी आणखी सापडलेवारणा विभाग शिक्षण मंडळाच्या कॅम्पसमधून तीन कोटी रुपये चोरीस गेल्याचे उघडकीला आल्याने पाेलिसांनी या कॅम्पसमध्ये येऊन बुधवारी चाैकशी केली. त्या वेळी या कॅम्पसमध्ये आणखी १ काेटी ३१ लाख रुपयांची राेकड पाेलिसांना आढळून आली. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अाणखीच वाढले आहे. बिल्डर झुंजार सरनोबत यांनी हे पैसे वारणानगरलाच का आणून ठेवले, याचाही पाेलिस शाेध घेत आहेत. सरनोबत हे कोल्हापुरातील अनेक वर्षे व्यवसाय करणारे बिल्डर आहेत. मात्र, कोल्हापूरचे असताना त्यांनी एवढी मोठी रक्कम वारणानगर येथील शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमधील फ्लॅटमध्ये का नेऊन ठेवली, चोरी झाल्यानंतर आठवड्याभराने फिर्याद का दिली?आदी प्रश्नांची उत्तरे पोलिसांना अजून सापडलेली नाहीत.जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी लुटीतील रक्कम वारणा शिक्षण संस्थेचे माजी सचिव जी. डी. पाटील यांची असल्याचा आरोप!

—————————————————————————

वारणानगर येथे मार्च २०१६ मध्ये वारणा शिक्षण समुहाच्या इमारतीत झालेल्या नऊ कोटी रुपयांच्या लूट प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी लुटीतील रक्कम वारणा शिक्षण संस्थेचे माजी सचिव जी. डी. पाटील यांची असल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पाटील यांच्या अपसंपदेची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. गुन्हा घडल्यानंतर २३ महिन्यांनी रकमेबाबत नवनवीन खुलासे होत असल्याने पोलिस तपासावरच प्रश्नचिन्हा निर्माण झाले होते .वारणा शिक्षण संस्थेचे माजी सचिव जी. डी. पाटील यांच्या ताब्यात असलेल्या इमारतीतून मार्च २०१६ मध्ये मैनुद्दीन मुल्ला या चोरट्याने तीन कोटी रुपयांची रक्कम लंपास केली होती. यानंतर मुल्ला सांगली पोलिसांच्या हाती लागला. सांगली एलसीबीने मुल्लाशी संगनमत करून नऊ कोटी रुपयांवर डल्ला मारला. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांनी फिर्याद दाखल केली. सांगली पोलिसांनी रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकारही सरनोबत यांच्या तक्रारीनंतरच उघडकीस आला. सांगली एलसीबीतील सहा पोलिसांसह मैनुद्दीन मुल्ला याला सीआयडीने अटक केली आहे. मात्र, याप्रकरणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी सोमवारी संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लुटीतील रक्कम फिर्यादी सरनोबत यांची नसून, ती संस्थेचे माजी सचिव जी. डी. पाटील यांची असल्याचा दावा त्यांनी केला. ती रक्कम पाटील यांनी संस्थेची फसवणूक करून जमा केली होती. याबाबत जी. डी. पाटील यांची पोलिसांनी चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदनही त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे दिले. जाधव यांच्या मागणीमुळे वारणा लुटीला पुन्हा नवीन वळण मिळाले असून, पुन्हा नवे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. दोन वर्षांनी का खुलासा?

—————————————————————————

मार्च २०१६ मध्ये लुटीची घटना घडली. वारणा शिक्षण संस्थेच्या इमारतीत घडलेल्या प्रकारामुळे ही रक्कम वारणा संस्थेचीच असावी या चर्चेला उधान आले होते. प्रत्यक्षात मात्र वारणा शिक्षण संस्था पोलिसांच्या तपासासह फिर्याद देण्यासही समोर आली नाही. दोन वर्षांनंतर विजयसिंह जाधव यांनी थेट संस्थेच्या माजी सचिवांवर आरोप केले आहेत. माजी सचिवांनी डोनेशनच्या रुपाने जमवलेल्या रकमेची लूट झाल्याचे त्याचवेळी का लक्षात आले नाही? दोन वर्षांचा कालावधी गेल्यानंतर पाटील यांच्या चौकशीची मागणी का केली जात आहे? फिर्यादी बनावट असल्याची शंका त्याचवेळी का घेतली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांच्या तपासावरही शंका उपस्थित केल्याने संपूर्ण प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली.पैसे नेमके कुणाचे?


लुटीतील १५ कोटी रुपयांची रक्कम जी. डी. पाटील यांची असल्याचा दावा विजयसिंह जाधव यांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र झुंजार सरनोबत यांनी रकमेवर दावा सांगून पोलिसांनी जप्त केलेली रक्कम कोर्टातून परतही मिळवली आहे. त्यापोटी दोन कोटी रुपयांचा प्राप्तिकरही त्यांनी भरला आहे. सरनोबत यांच्या सांगण्यानुसार लुटीतील रक्कम त्यांच्या बांधकाम व्यवसायातील होती. विजयसिंह जाधव यांच्या आरोपानुसार लुटीतील रक्कम वारणा शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या डोनेशनमधील होती. ती रक्कम पाटील यांचीच असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. दोन वेगवेगळ्या दाव्यांमुळे लुटीतील रक्कम नेमकी कोणाची आणि कोणत्या मार्गातून कमवलेली होती याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.आरोपी अटकेत, पण गूढ कायम

—————————————————————————

कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कार्यालय चे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.विश्वास नांगरे-पाटील यांनी वारणा लुटीचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सीआयडीकडे सोपवला.यानंतर सीआयडीने मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला, सांगली एलसीबीचे निलंबित निरीक्षक विश्वनाथ घनवट याच्यासह सात जणांना अटक केली.कोल्हापूर एलसीबी,कोडोली पोलिस ठाणे आणि सीआयडीनेही मैनुद्दीन मुल्ला याची चौकशी केली.आठ महिन्यांचा अपवाद वगळता गेली दोन वर्षे मुल्ला तपास यंत्रणांच्या ताब्यात होता. लुटीतील पोलिसही अटकेत आहेत. तपास यंत्रणांनी फिर्यादी सरनोबत,जी. डी. पाटील यांचीही चौकशी केली. मात्र, या लुटीतील गूढ अद्याप कायम आहे.रक्कम नेमकी कोणाची? किती? ती कोठून आली? कुणी किती रक्कम चोरली? चोरलेल्या रकमेचे पुढे काय झाले? याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.पोलिस अधिकारीच निघाले दरोडेखोर नऊ कोटी रुपयांची रक्कमेवर एका पोलिस निरीक्षकासहकर्मचाऱ्यांनीच दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

—————————————————————————

वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीत बंद फ्लॅटमधील सुमारे सव्वा नऊ कोटी रुपयांची रक्कमेवर एका पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांनीच दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी सांगलीचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ धनवट यांच्यासह एक सहायक पोलिसनिरीक्षक, एक सहायक फौजदारासह नऊ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांवर संगनमताने चोरीसह अपहार असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.या घटनेने राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल झालेल्या इतर संशयितांची नांवे अशी, सांगलीचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील, रवींद्र पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहिद्दीन मुल्ला (रा. बेथलनगर, सांगली) आणिप्रवीण भास्कर सावंत (रा. वासुद, सांगोला) अशी आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, वारणानगर येथे शिक्षक कॉलनीतील इमारत क्रमांक 5 मधील फ्लॅट क्रमांक बांधकाम व्यवसायिक झुंजार माधवराव सरनोबत यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमधून 12 मार्च2016 रोजी मैनुद्दीन उर्फ मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (वय 42, रा. बेथेलहेमनगर, मिरज) याने सुमारे साडेतीन कोटी रुपयांची चोरी केली. याबाबत सरनोबत यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी चोरटा मैनुद्दीन याला अटक करून चोरीतील 3 कोटी 7 लाख 63 हजाराची रोकड पोलिसांनी जप्त केली. चौकशी दरम्यान त्यांनी मैनुद्दीन याला चौकशीसाठी पुन्हा वारणानगर येथील संबंधित इमारतीतत नेले. त्याठिकाणी पोलिसांना पुन्हा सुमारे दीड कोटींची रक्कम पोलिसांना मिळून आली.ती त्यांनी जप्त केली.चौकशीत मैनुद्दीन यांने चोरलेली रक्कम पोत्यातूनभरून मिरजेतील घरातआणल्याची पोलिसांनी कबुली दिली होती.त्यामुळे फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.याप्रकरणी शिक्षण संस्थेतीलपदाधिकाऱ्यांसह अनेकांची चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली होती. वारणानगर येथील इमारतीत कोट्यावधीची रक्कम होती. त्याचा सर्वांगीण तपास व्हावा,ती रक्कम नेमकी कोणाची आहे याची चौकशी करून सत्य जनतेसमोरआणावे अशी तक्रार शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती.त्याअनुषंगाने नांगरे-पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे अधिकार अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिले. शर्मा यांनी या प्रकरणी गेली साडेतीन महिने तपास केला.त्यात धक्कादायक माहिती पुढे आली.9 कोटी 18 लाखाची रक्कम संगनमताने आणि अधिकाऱ्याचा गैरवापर करून खुद्द दोन पोलिस अधिकारी व पाच पोलिस कर्मचाऱ्यानेच लाटल्याचे पुढे आले.झुंजार सरनोबत यांच्या मालकीच्या फ्लॅटमधून चोरील गेलेल्या रक्कमेच्या तपासा दरम्यान 13 मार्च 2016 रोजी सुमारे 6 कोटीची रक्कम तर15 मार्च 2016 रोजी 3 कोटी 18 लाख असे एकूण 9 कोटी 18 लाखाची रक्कम संगनमताने आणि अधिकाऱ्याचा गैरवापर करून खुद्द दोन पोलिस अधिकारी व पाच पोलिस कर्मचाऱ्यानेच लाटल्याचे पुढे आले.याप्रकरणी झुंजार सरनोबत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोडोली पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले.यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवटसह दोन पोलिस अधिकारी, पाच कर्मचाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला.त्यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. या सर्वांवर कलम 454, 380, 120 (ब), 166, 411सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतचा पुढील तपास करवीर पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.

—————————————————————————

“नऊ कोटी चोरी” वारणेच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला याची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. सांगलीतील गणेशनगर येथे अज्ञात आरोपींनी पाठलाग करून त्याच्यावर धारदार शास्त्राने वार केले.यामध्ये मैनुद्दीन मुल्ला याचा जागीच मृत्यू झाला. (Accused in robbery murdered in Sangli)सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या बेथेलनगर मधील तीन कोटीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला याची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. सांगलीतील गणेशनगर येथे अज्ञात आरोपींनी पाठलाग करून त्याच्यावर धारदार शास्त्राने वार केले. यामध्ये मैनुद्दीन मुल्ला याचा जागीच मृत्यू झाला.(Accused in robbery murdered in Sangli)या घटनेनंतर मिरज परिसरात मोठी खळबळ माजली. या प्रकारानंतर घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मैनुद्दीन मुल्लावर वार करून हल्लेखोर फरार झाले. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र, खून नेमकं कोणत्या करणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही.सांगली जिल्ह्यातील बेथेलनगर येथून एका झोपडीतुन 2016 साली तीन कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणी मैनुद्दीन मुल्ला याला त्यावेळी अटक झाली होती.कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथील, बांधकाम व्यवसायिक झुंजार सरनोबत यांची 8 मार्च 2016 रोजी तीन कोटी अकरा लाख रुपये रक्कमेची चोरी झाली होती. सांगली पोलिसांनी संशयित मैनुद्दीन मुल्ला या चोरट्यास ताब्यात घेतल्यानंतर वारणा नगर चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.त्यानंतर कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांनी चोरीच्या रकमेवर दावा करीत पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली. पोलिसांच्या तपासात मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून अनेक नवे खुलासे झाले. मैनुद्दीनला जामीन मिळाला होता. वारणानगर मधील शिक्षक कॉलनीतून जप्त केलेल्या तीन कोटी अकरा लाखांपेक्षा अधिक मोठी रक्कम पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी मैनुद्दीनशी संगनमत करून वरील रक्कम हडप केल्याचा आरोप झुंझार सरनोबत यांनी केला होता. या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचारी असा दुसरा गुन्हा दाखल झाला होता.झुंझार सरनोबतांनी मैनुद्दीन मुल्लाला दिली होतीजीवे मारण्याची धमकी.पोलिसांच्या विरोधात चोरीची फिर्याद देणाऱ्या झुंजार सरनोबत यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मैनुद्दीन मुल्ला याने केला होता. या प्रकरणी आरोपी मुल्ला याने संरक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी काही काळ मैनुद्दीन मुल्ला याला संरक्षणही पुरवले होते.तत्कालीन परिस्थितील प्रतिक्रिया.विजयसिंह जाधव,प्रवक्ते,जनसुराज्य शक्ती पक्षलुटीतील रकमेचा मालक लपवण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलिसांनी नव्याने तपास करावा. अन्यथा आम्ही जी. डी. पाटील यांच्याविरोधात फिर्याद दाखल करू. ती रक्कम पाटील यांनी संस्थेची फस‌णूक करून गैरमार्गाने मिळवलेली आहे.झुंजार सरनोबत, फिर्यादीकोर्टात खटला दाखल असल्याने याबाबत अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही. रक्कम माझी होती याबाबतचे सर्व पुरावे मी प्राप्तिकर विभाग आणि पोलिसांकडे दिले आहेत. याशिवाय प्राप्तिकरही भरला आहे. याबाबतची माहिती मी कोर्टात सादर करणार आहे.नरेंद्र गायकवाड,तपास अधिकारीयांची प्रतिक्रिया जाधव यांची तक्रार अद्याप सीआयडीला मिळालेली नाही. तपासाबाबत काही तक्रार असेल तर याची दखल घेऊन नव्याने तपास केला जाईल. मात्र, एवढ्या वेळाने का माहिती दिली जात आहे हेही पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *