
गगनबावडा तालुक्यातील निवडे वनविभाग कर्मचार्यांचा मनमानी कारभार .
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
प्रदिप गुरव / गगनबावडा प्रतिनिधी:
गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील वनपालांच्या मनमानी कराभारा मुळे नागरिक हैराण झाले आहेत . आमच्यावर पत्रकारांचा दबाव आहे त्यामुळे आम्ही तुमच्यावर कारवाई करणार असे निवडे चे वनपाल सुर्यकांत गुरव शेतकर्यांना बोलल्याची चर्चा तालुकाभर रंगू लागली आहे.
गगनबावडा तालुका निसर्ग संपन्न तालुका आहे प्रती महाबळेश्वर म्हणून ही या तालुक्याकडे बघितले जाते.
या तालुक्याला मोठी जंगली संपत्ती लाभलेली आहे येथील जंगलात हेळा , फणस , अंबा , जांभूळ , काजू ,निलगिरी , बाभळ , पळस, बावा , सातवान , आशा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात .त्याचबरोबर राष्ट्रीय प्राणी शेकरू, ससा, सांबर, गवा , साळींदर , भेकर , गेळा, मोर, कोल्हे , वाघ , घोरपड अशा अनेक पशु पक्षी व औषधी वनस्पतीमुळे गगनबावडा तालुक्यातील जंगल म्हणजे समृद्ध जंगल असे ओळखले जाते.

या जंगलावरच आधिकाऱ्यांच्या आर्थिक लागेबंधामुळे मोठी वृक्ष तोड चालू व वनविभागाने जळीत रेषेसाठी असलेल्या निधीमध्ये केलेला भष्टाचार या कामकाजाबाबत गगनबावडा तालुक्यातील पत्रकारांनी निर्भिडपणे आवाज उठवला होता. त्यामुळेच झोपेचे सोंग घेतलेले कर्मचारी जागे झाले आहेत. आर्थिक लागेबांदे असल्याने व्यापारी व अवैध्य वृक्षतोड सोडून काही कारणास्तव शेतकऱ्यांच्या हातून एखादा वृक्ष तुटल्यावर कारवाई करत आमच्यावर पत्रकारांचा दबाव आहे. असे निवडे चे वनपाल सूर्यकांत गुरव हे बोलत असल्याची चर्चा तालुकाभर रंगली आहे. तर गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथील देसाई आण्णा या व्यक्तीवर ऑफिस मध्ये बोलवून तू शिकार करतोस तू मान्य कर असा दबाव आणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचेही देसाई आप्णानी सांगितले. या प्रकाराने भयानक मानसिक त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले अशा नाहक त्रास देणाऱ्या कर्मचार्याच्यावर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी गगनबावडा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे .
