महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई. व विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठाण, सांगली संचलित लिंक वर्कर स्कीम च्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील १०० गावांमध्ये एचआयव्ही व एड्स विषयी प्रबोधनाचे काम सुरू.

Spread the love

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई. व विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठाण, सांगली संचलित लिंक वर्कर स्कीम च्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील १०० गावांमध्ये एचआयव्ही व एड्स विषयी प्रबोधनाचे काम सुरू.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे

सांगली – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई. व विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठाण, सांगली संचलित लिंक वर्कर स्कीम च्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील 100 गावांमध्ये एचआयव्ही व एड्स विषयी प्रबोधनाचे काम सुरू आहे. या प्रबोधनाच्या माध्यमातून गावामध्ये युवक – युवती, महिला, ट्रकर्स, मायग्रंट, महिला बचत गट, कॉलेजचे विद्यार्थी या सर्वांना एचआयव्ही – एड्स व गुप्तरोग याच्या विषयी माहिती दिली जाते याचबरोबर गावामधून प्रत्येकाला एचआयव्हीची माहिती व्हावी आणि निसंकोचपणे शासनाचा टोल फ्री क्रमांक 1097 वरून माहिती जाणून घ्यावे असे आवाहन करण्यात आले.

याचबरोबर गावामध्ये एचआयव्हीची तपासणी कॅम्प सतत आयोजित केले जातात त्यामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन आपली एचआयव्ही स्थिती जाणून घ्यावी, प्रकल्पाच्या माध्यमातून गावांमध्ये विविध प्रबोधन व जनजागरणाचे कार्य गेले अखंड आठ वर्षे सुरू आहे आज याचाच एक भाग म्हणून एचआयव्ही एड्स विषयी परिपूर्ण माहिती असलेली फलक चे अनावरण मा.सरपंच सौ. गीता ताई चिंचकर, उपसरपंच श्री. विष्णू लवटे, पॅनल प्रमुख मा. सुभाष अण्णा चिंचकर, मा. ग्रामविकास अधिकारी श्री. सचिन पाटील, सदस्य प्रियांका बामणे, संगीता पाटील, मनीषा दुधाळ, अर्चना पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी व आशा वर्कर, लिंक वर्कर स्कीमचे श्री.अनिल मोरे श्री.मनोज कांडकर, सीमा घोंगडे इत्यादी सर्वजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *