
कोल्हापूर येथे वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरी
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
कोल्हापूर जिल्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती संयुक्त जयंती समारोह समिती कोल्हापूर यांच्या वतीने आज दि.१२मे २०२५ रोजी वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मा.खासदार छ.श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांच्या कार्यालयात सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती संयुक्त जयंती समितीच्या वतीने अध्यक्ष मा.प्रेमानंद मौर्य यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती (बुद्धरुप) खासदार छ.श्री.शाहू महाराज यांना भेट देण्यात आली.याप्रसंगी कोल्हापूर येथे मध्यवर्ती ठिकाणी बुद्ध विहार,ग्रंथालय, मेडिटेशन हॉल,व मोठा हॉल ,या उभारणीसाठी किमान दोन एकर एवढी जागा मिळणेबाबतचे निवेदन मा.खासदार महाराज यांना देण्यात आले.याप्रसंगी कार्याध्यक्ष रंगराव मांडरे,वैभव प्रधान,डी.जी. भास्कर,अनिल माने,प्रमोद हुपरीकर,प्रकाश हुलस्वार,
उषा गवंडी,सुनिल कुमार कांबळे,
मा.प्रशांत गवळी,आर.एस.कांबळे,सुकुमार कोठावळे शांताराम वाघमारे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
