
“टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात झाले.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
‘टेक-वारी’: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक हा उपक्रम प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशासकीय क्षमता विस्तारण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. बदलांचा केवळ स्वीकार करत नसून बदलाचे नेतृत्व करत असल्याचा संदेश ‘टेक वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून जाईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात झाले.



यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर.विमला, प्रसिद्ध वक्ते प्रभू गौर गोपालदास यासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
