जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळी इयत्ता १ ली ७ वी १९९५-९६ बॅच विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

Spread the love

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळी इयत्ता १ ली ७ वी १९९५-९६ बॅच चा विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क :-जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे

    मंगळवार दिनांक 22-4-2025 रोजी विद्यार्थी स्नेह मेळावा विहान राजे कार्यालय मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनादी अनंत काळापासून गुरूंना देव मानण्याची आपली संस्कृती आज ही अखंड आहे. कारण आपणासारखे गुरुवर्य जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूतीसारखे झिजत आहेत. आज आम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचे स्थान बळकट करीत आहोत कारण तुम्ही आमचे मन- मनगट आणि मेंदू समृद्ध केलेत.

गुरुजी तुम्ही आम्हाला फक्त अक्षरांची साक्षरताच नव्हे तर माणुसकीची जागरूकता शिकवलीत. कुंभार ज्याप्रमाणे फिरत्या चाकावरती चिखलाच्या गोळ्याला सुंदर असा आकार देऊन त्यातून मडके घडवतो अगदी त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला शिक्षणाच्या गतिशील चाकावरती संस्काराचे हात फिरवून आमच्यातला माणूस घडविलात.

  आज आम्ही त्याच गुरूच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी आतुर आहोत जन्माला घालणारी आई पालन पोषण करणारा बाप यांच्या नंतर जीवनातला खरा आकार देतात ते ज्ञान देणारे गुरुवर्य. एखादा इंजिनियर दुसरा इंजिनियर घडवू शकत नाही एखादा डॉक्टर दुसरा डॉक्टर घडवू शकत नाही किंवा एखादा वकील दुसरा वकील घडवू शकत नाही परंतु असे हजारो डॉक्टर वकील इंजिनिअर शिक्षकच घडवू शकतात ही सृजनशीलता ज्याच्या ठाई आहे त्या गुरुवर्यांच्या चरणांना वंदन करणे हे आमचे आद्यकर्तव्य. च्या पवित्र देशात आपण राहतो त्या भारत वर्षामध्ये तक्षशिला नालंदा यासारखी विश्वविद्यालय जगाला ज्ञान देण्याचे कार्य प्राचीन काळापासून करीत होती तेव्हापासूनची गुरु शिष्य परंपरा या मातीमध्ये आजही पाय रोवून उभी आहे आणि याच धरतीवर हा देश महासत्तेकडे वाटचाल करतो आहे यात ज्ञान देणाऱ्या गुरुजनांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे

असे आम्हा सर्वांच्या जीवनाचे शिल्पकार असणाऱ्या तुम्हा गुरुजनांचा गौरव आजच्या शुभ दिनी करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे आपण हाती दिलेल्या ज्ञानाचा दिवा सदैव तेवत ठेवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपणास सुखी समाधानी निरोगी दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपल्या चरणी पुन्हा एकदा त्रिवार वंदन करतो.

माझी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक स्नेह मेळावा इयत्ता सातवी बॅच 1995-96 आयोजित करून सुरूवात भव्य अशी रांगोळी काढून सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी यांनी सर्व शिक्षक, शिक्षकांवर पुष्पांचा वर्षाव करत गुरुजनांचे स्वागत केले.शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून दिप- प्रज्वलन केले. स्नेहम मेळाव्याचे स्वागत करताना आमचे प्राध्यापक मित्र राजेंद्र पाटील, स्वाती शिंदे यांनी गुरुजनांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले
यावेळी उपस्थित गुरुजन मा.श्री. बाबासो गायकवाड सर, मा.श्री बबन भोरे सर, मा.श्री. आदगोंडा कांबळे
सर, मा.श्री.इनामदार सर (मुख्याध्यापक सावळी शाळा) मा.सौ. सावित्री माळी मँडम,मा. सुवर्ण कुडाळकर मँडम व सर्व मित्र, मैत्रीणी उपस्थित होते
यावेळी उपस्थित गुरूजीनंवर्ग, मित्र ,मैत्रीणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपलीं स्वतःची ओळख करून दिली.शाळेतील जून्या आठवणी सांगितल्या.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक सावळी शाळासाठी आमच्या 1995-96 बॅच कडून भेटवस्तू स्वरूपात (डाईस) देण्यात आला. यानंतर जेवणाचा मनमुराद आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करत करण्यात आली.शेवटी निरोप समारंभ करत असताना आभार माझी उपसरपंच श्री. सचिन मोरे यांनी केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थी
नांव सतीश कोरे दिगंबर गुरव दिनकर पवार मनोज कांबळे अनिल लोंढे सुरेश वाघमारे नायकू पवार परशुराम तोडकर सचिन मोरे रवींद्र साळुंखे रावसाहेब गव्हाणे विनोद मोरे विजय कांबळे सचिन शिंदे संतोष माळी मारुती माळी विजय शिंदे सुरेश तांबडे विनायक अडसुळे शिवाजी कुपवाडे शशिकांत कुपवाडे महादेव बंडगर राजेंद्र पाटील प्रदीप बबलेश्वर दीपक माळी विद्यार्थिनी स्वाती शिंदे सुजाता शिंदे अर्चना माळी मनीषा पवार वंदना शिंदे शोभा चौगुले सविता मोरे जसवंती आठवले रेश्मा मुलानी रूपाली चौगुले रूपाली माळी सीमा मोरे बुचडे स्मिता साळुंखे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *