
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.
बिहार येथे होणाऱ्या ७ वी खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेसाठी शांतीनगर व्यायाम मंडळाचा खेळाडु कु.अभिषेक (बाबु) सुनील केंचे यांची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड
भारत सरकार द्वारा घेण्यात येणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम या विविध खेळांच्या निवड चाचण्या गेल्या काही दिवसांमध्ये देशभर सुरू होत्या. यामध्ये यामध्ये शांतीनगर व्यायाम मंडळाचा खेळाडू कु.अभिषेक केंचे याने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या ठिकाणी जिल्हास्तरीय खेलो इंडिया निवड चाचणी मध्ये सांगली पार पडली यामध्ये सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संलग्न संघटनेचे दोन खेळाडू निवड चाचणीसाठी उपस्थित होते, यामध्ये पाच खेळाडूंची निवड करण्यात आली, त्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी पाच जिल्ह्याच्या विभागीय निवड चाचणीमध्ये पाच खेळाडूंमध्ये अभिषेक ची निवड निश्चित झाली.

त्यानंतर बालेवाडी जिल्हा पुणे या ठिकाणी खेलो इंडिया युथ गेम महाराष्ट्र संघाच्या निवडी पार पडल्या यामध्ये सांगली जिल्ह्याचा अभिषेक सुनील केंचे याचे अंतिम बारा खेळाडूंमध्ये पाचव्या क्रमांकाला खेलो इंडिया युथ गेम्स महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली. २५.४.२०२५ पासून बालेवाडी पुणे या ठिकाणी बिहार येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी निवासी कॅम्प घेण्यात आलेला आहे. 4 मे ते 8 एप्रिल या दरम्यान बिहार येथे सातवी खेलो इंडिया युथ गेम्स बिहार 2025 या कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे. सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने अभिषेक चा सत्कार करण्यात आला. अभिषेक या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करेल असा विश्वास सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके व, कार्यवाह नितीन काका शिंदे यांनी व्यक्त केला.
अभिषेकला लहान मनापासून मोलाचे मार्गदर्शन मंडळाचे सर्वेसर्वा व प्रशिक्षण आकाश तिवडे,नितीन आवळे, गणेश चव्हाण,शेखर मोहिते, विशाल मोरे,लखन मोरे, आशिष मोहिते, सुदर्शन मद्रासी, नितीन मोरे, सुरज लोंढे, इत्यादींनी केले. यावेळी आकाश तिवडे यांनी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
