बेकायदेशीर रित्या गांजा विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास कुपवाड येथे अटक.

Spread the love

बेकायदेशीर रित्या गांजा विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास कुपवाड येथे अटक

दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी-मनोज कांबळे

कुपवाड-एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. प्रणिल गिल्डा यांनी सूचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध अंमली पदार्थ विक्रीविरोधात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.

सदर पथक हद्दीत गस्त घालत असताना पोहेकॉ वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुबेर किराणा दुकानामागे, उल्हासनगर, कुपवाड येथील चिंचोळ्या बोळात एक इसम गांजाची विक्री करत आहे.

मिळालेल्या माहितीचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आनंदराव घाडगे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी सापळा रचला.कारवाईदरम्यान आरोपी हा गांजा विक्री करताना रंगेहाथ आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडून १३,०७५ रुपये किंमतीचा ५२३ ग्रॅम गांजा तसेच १० रुपये किंमतीची एक पिशवी असा एकूण १३,०८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अटक आरोपीचे नाव व पत्ता :नरसगोंडा उर्फ बंडू आदगोंडा चिंचवाडे (वय ४० वर्षे),रा. कुबेर किराणा दुकानामागे, उल्हासनगर, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल थोरात हे करीत आहेत.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आनंदराव घाडगे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल थोरात, पोउनि बळीराम पवार, पोहेकॉ वैभव पाटील, पोहेकॉ निलेश कोळेकर, पोना राजेश कांबळे, पोकों संदीप घस्ते, पोकों प्रकाश सांगोलकर, चालक ग्रेड पोउनि भोसले व पोशि चंद्रकांत खोबरखेडे यांनी केली.एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, परिसरात कोणीही अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

दैनिक वृत्तवेग मुख्य संपादक गणेश वायदंडे संपर्क-९९७५३३९४३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *