
मिरजेचे आमदार यांनी वादग्रस्त वक्तव्य बाबत निषेध
वृत्तवेग न्यूज नेटवर्क-रमजान मुलानी
वरील विषयास अनुसरून काल दि. १०/०१/२०२५ रोजी सांगली येथे २८८ चे आमदार मा. सुरेश भाऊ खाडे यांनी मी मिनी पाकिस्तान मधून ४ वेळा निवडून आलो आहे असे वादग्रस्त व्यक्तव्य करून मिरजेतील नागरिकांचे मने दुखावले आहेत. त्या संदर्भात आज महाराणा प्रताप चौक मिरज येथे दि. ११/०१/२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जमीर सनदी युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जमीर सनदी यांच्या उपस्थितीत रमजान मुलानी, शांतिनाथ पाटील, सचिन शिरढोणे, इम्रान आलासे, सरदार मुलानी , नजीर मुजावर, कैफ पटेल, सद्दाम खान, मुजफ्फर बिजापुरे, अरबाज कुरणे, नदीम शेख, जाफर मुल्ला, अय्याज मुजावर, दस्तगीर मुजावर, जमीर सनदी युथ फाऊंडेशन चे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते