
आर्टीत सुभाषचंद्र बोस, बाळासाहेबांची जयंती साजरी
दैनिक वृत्तवेग मुंबई. दि.23 :
भारताच्या स्वातंत्र्यासाठी अखंड लढा देणारे, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी अखंड लढा देणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त जयंती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे व निबंधक इंदिरा अस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी येथील अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेत साजरी करण्यात आली.
उपलेखापाल विनायक लांघी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या समग्र कार्यावर प्रकाश टाकला. तर सहाय्यक नितीन साळूंके यांनी मराठी अस्मीतेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कार्याचा आलेख मांडला.
यावेळी प्रकल्प व्यवस्थापक धोडींबा नामवाड, संशोधन अधिकारी डॉ. धनंजय भिसे, संशोधन अधिकारी डॉ. आम्रपाली थोरात, प्रकल्प अधिकारी सायली लोमटे, प्रकल्प समन्वयक विदुला मोहिते, संशोधन सहाय्यक, योगीता कांबळे, आकाश चव्हान, अक्षय जाधव, सहाय्यक नितिन साळुंखे, पवन साळवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी स्वप्नील भालेराव यांनी केले तर सहाय्यक अमोल तुपसुंदर यांनी उपस्थीतांचे आभार मानले.
