



सकल मातंग समाज महाराष्ट्राची चिंतन बैठक मुंबई येथे संपन्न
वृत्तवेग न्यूज नेटवर्क:
मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुंबई कार्यालयात सकल मातंग समाजाची चिंतन बैठक नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघात संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यातील सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक उपस्थित होते. सदर बैठकीत उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्ते आणि प्रतिनिधींची समाजाच्या अनेक विषयावर चर्चा झाली. यापैकी आर्टीची (अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण आणि संशोधन संस्था) याची सध्यस्थीती, न्यायमूर्ती बद्दर समितीची सध्यस्थिती,
महामंडळाची सध्यस्थिती इत्यादि
विषयावर सविस्तर चर्चा करून न्यायमूर्ती बद्दर समितीला आरक्षण वर्गिकरणाचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुदतवाढ द्यावी आणि लवकरात लवकर आरक्षण वर्गिकरणाचा अभ्यास करून अहवाल शासनाला सादर करून अबकड ची अंमलबजावणी व्हावी यासाठीचा पाठपुरावा सरकार कडे करून बोलणी करावी आणि सरकारला काही काळ संधी द्यावी अन्यथा सकल मातंग समाज महाराष्ट्रभर आंदोलन करेल असा इशाराही या बैठकीत करण्यात आला.
तसेच या बैठकीत आर्टी ला कंपनी कायद्याखाली नोंदणी उशिरा झालेली असली तरी आता आर्टीच्या माध्यमातून लवकरात लवकर कोर्सेस आणि योजना मुलामुलींसाठी तयार कराव्यात असेही ठरले.
ऐनवेळेच्या विषयात अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जाचक अटी रद्द करून अण्णासाहेब पाटील ओबीसी महामंडळाच्या नियम आणि अटी लागू कराव्यात असेही या बैठकीत ठरले.
या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून बाबुराव मुखेडकर, लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले.
या बैठकीचे प्रास्ताविक प्रा. पंडित सूर्यवंशी यांनी केले तर आभार दत्ता घोडके यांनी मानले.
या बैठकीत समाजाच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी डॉ अंकुश गोतावळे, रणधीर कांबळे,अॅड. राम चव्हाण,अॅड. गडीकर, अॅड. रमेश शिंदे ,बाबुराव आंबेगवे, बाळासाहेब शिरसाठ, संदीप ठोंबरे, सुदाम धुप्पे,प्रा، पंडित सूर्यवंशी, भास्कर नेटके, राजाभाई सूर्यवंशी,मयूर जाधव, बालाजी जाधव, मधुकर साठे, मनोज कांबळे,प्रकाश चव्हाण, भरत कोल्हे, परशुराम साठे, दिलीप साठे, बाळासाहेब कसबे,प्रीतिराज सकट, रामकिशन कलवले, युवराज शिंदे, कैलास ढाकोरे, मोहन कांबळे, सचिन नेटारे, अशोक साठे, संतोष महाडिक, राहुल सकट, श्रीकांत शिंदे ,दत्ता घोडके, श्रीनिवास मुखेडकर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.