Spread the love

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक २०२५/२६ वाहतुकी बाबद आदेश.

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक २०२५/२६ वाहतुकी बाबद आदेश.

दैनिक वृत्तवेग.

मतमोजणी दरम्यान सांगली–मिरज मार्गावरील वाहतूक वळविण्याचे आदेशसांगली, दि. १३ जानेवारी २०२६ :सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सेंट्रल वेअर हाऊस परिसरात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ लागू करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पोलीस वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची वाहने वगळता इतर सर्व वाहतूक काही मार्गांवर तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.प्रवेश बंद असलेले मार्गमिरज ते सांगली रोडवरील हनुमान मंदिर चौक ते समर्थ न्यूरो हॉस्पिटलपर्यंतच्या दक्षिणेकडील बाजूचे जोड रस्ते.रवा मैदा फॅक्टरी / सिद्धीविनायक कॅन्सर हॉस्पिटल चौक येथून जड वाहतूक व एस.टी. बसेसना सांगली शहरात प्रवेश बंद.हनुमान मंदिर चौकातून दुचाकी वगळता इतर वाहनांना सांगलीकडे जाण्यास मनाई.

पर्यायी वाहतूक व्यवस्थाजड वाहतूक व एस.टी. बसेससाठी :महात्मा गांधी चौक – मिरज सिरॅमिक कॉर्नर – रवा मैदा फॅक्टरी रोड – सह्याद्री स्टार्च मागील रस्ता – कुपवाड रोड – संत रोहिदास कमान – कुपवाड सोसायटी चौक – सम्राट अशोक चौक – लक्ष्मी मंदिर चौक मार्गे सांगली.रिक्षा व हलक्या वाहनांसाठी :महात्मा गांधी चौक – मिरज सिरॅमिक कॉर्नर – सेवासदन हॉस्पिटल चौक – हनुमान मंदिर चौक – पालवी हॉटेल बायपास रोड – चाणक्य चौक – विजयनगर चौक किंवा सम्राट अशोक चौक – लक्ष्मी मंदिर चौक मार्गे सांगली.सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *