
सावज टिपणाऱ्या नजरा!.
…………………………………………
भाग-२
अनैतिक संबंधातून फौजदाराने,आपल्या बायकोच्या प्रियकरास यमसदनी धाडले!पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोलिस ठाण्यातील घटना!
………………………………………………….
https://vruttvegnews.com
…………………………………………………..
पोलीस,पत्रकार,वकील यांची नजर अतिशय तीक्ष्ण असते.मात्र यांना देखील धूळ टाकणारी नजर सावज टिपणारी असते.अशा नजरांच्या अवलादी 36नखरेवाली असतात.त्यांच्या आपमतलबी आणि स्वार्थी धोरणामुळे,कुटुंबाची होणारी वाताहत,काळवंडली जाणारी नात्याची,कायमची दुरावलेली मने,अनेकांची कुटुंबे उध्वस्त करणारी ठरतात.गावगाड्याच्या रिकामे माळावरती गावाला सोडलेल्या वळूसारखी सरतेशेवटी असल्या,हरामखोर आवलादी अनेक कुटुंबांना उध्वस्त करून निवांत फिरत असतात.
कोल्हापूर जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा च्या,ऐतिहासिक अशा पतितपावन पन्हाळगडाच्या टोका वरती, वारणा हे नाव आशिया खंडामध्ये एकेकाळी प्रसिद्ध होते. वारणा सहकारी साखर कारखाना वारणा सहकारी दूध संघ,महिला लिज्जत पापड व वारणा शैक्षणिक उद्योग समूह,यामुळे नाव आहे.आज रोजी महाराष्ट्राच्या,त्रीखंडांमध्ये दुमदुमत आहे.गाजत आहे.या
वारणा परिसराचे नेतृत्व विद्यमान आमदार विनय रावजी कोरे,विधीमंडळाचे सदस्य म्हणून करत आहेत.याच वारणा,शेजारी असणारी अतिशय मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत कोडोली,माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांची जन्मभूमी,पनाळा तालुक्याच्या राजकीय रजत पटावर ती प्रसिद्ध आहे,माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांनी एक हाती पंचवीस वर्षे विधीमंडळाचे सदस्य म्हणून,आमदार म्हणून नेतृत्व केलेले आहे काँग्रेस पक्षाकडून. या,गावांमध्ये असणाऱ्या पोलीस ठाण्यांतर्गत,कोडोली व साखर पट्ट्यातील गावातील नागरिकांची सुरक्षा, करण्याचे मोठ्या जोखमीचे काम या पोलिस स्टेशन,कडून केले जाते.
सन दोन हजार( सात आठ) चा तो काळ होता.सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संपतराव पाटील,यांचेकडे कोडोली पोलिस ठाण्याचा कार्यभार होता.जगातला प्रत्येक माणूस,हा कुटुंबवत्सल,पत्नी प्रेम व पुत्र प्रेमासाठी आपल्या आयुष्याची शेवटच्या कारकीर्दीपर्यंत झगडत असतो.तो नोकरी करतो,वा व्यवसाय करतो,उद्योग करतो,आपल्या,कुटुंबासाठी अखेरपर्यंत झटत असतो,याला वर्दीदार असो,श्रीमंत असो वा सामान्य मध्यमवर्गीय असो अपवाद राहत नाही.मात्र अशा सुखी संसाराच्या कुटुंबामध्ये जर,सावज टिपणाऱ्या नजरा,घरभेदी असतील तर,बेचिराख वाळवंटामध्ये पानवठ शोधण्या सारख्या कुटुंब प्रमुखाची अवस्था नेहमी होत असते.पाण्यावाचून तडफडणार्या माशासारखी,याला कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संपतराव पाटीलहे अपवाद ठरले नाहीत.कोडोली पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या कोडोली गावातील एका,किरकोळ ओळखीतून कौटुंबिक सौदार्य झालेल्या तरुण मुलाच्या प्रेमात,सहाय्यक पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांची पत्नी ही अनपेक्षितपणे प्रेमात पडल्याने,दोन्ही बाजूंनी सावज टिपले गेले.
अगोदरच अनेक कारणाने वादातीत सापडणारी,वर्दी,अशात अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने,असंतोषाने खदखदत होती.मात्र घरचा भेदीच,वासनांध झाल्याने,झाकून राहणारी अब्रू चव्हाट्यावर ती येऊ लागल्याने,सहाय्यक पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांच्या,रागाने टोकाची भूमिका घेऊन,तीन नद्यांचा संगम प्रीतीसंगम म्हणून ओळख असणाऱ्या,कृष्णा व कोयनेच्या तीरावरच्या,आडवाटेच्या नदी किनाऱ्यालगत,त्याच्या पत्नीच्या प्रियकराला गोड बोलून बोलवूनन घेऊन,अतिशय निर्दय पणे त्याचा खून करून शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे इसतता फेकण्यात आले.प्रेमात पडलेल्या त्या तरुण युवकाच्या, शरीरातील महत्त्वाचा अवयव देखील कृतज्ञपणे रागाने कापून टाकण्यात आले असे निदर्शनास आले.
घटना घडली पासून सहा ते सात महिन्यांनंतर,खून झालेल्या मुलाच्या आईने,मुलगा हरवले बाबाची मिसिंग ची रीतसर तक्रार कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक श्री शिंदे यांचेकडे दाखल केली होती.या मिसिंग तक्रारीचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली,जलद गतीने सुरू झाल्याने,आरोपी संपतराव पाटील त्याची पत्नी व अन्य सहा नातेवाईक यांना कोडोली पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.
वर्दीचा पोलीस खाक्या,फौजदाराला दाखव ताच,त्याने आपला गुन्हा कबूल केल्याने,सदर प्रकरणांमध्ये एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती.मृत झालेल्या तरुणाच्या,त्याचा खून करणे,केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट परस्पर लावणे अर्थात पुरावा नष्ट करणे,खून करण्यामध्ये इतरांचा समाविष्ट असणे,आधी कारणामुळे,पुढील तपास कराड पोलिस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी तातडीने व जलद गतीने करून,न्यायालयामध्ये चार्जशीट,आरोपींचे विरोधात दाखल करून,सातपैकी पाच आरोपींना आजन्म कारावासाची न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.तर सात पैकी एका आरोपीला एक वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती.
ज्या प्रेयसी मुळे हे संपूर्ण प्रेम प्रकरण घडले होते, ते सहाय्यक फौजदार संपतराव पाटील यांची पत्नी,निर्दोष पणे सुटली गेली.नवरा फौजदार असतानादेखील पती सुखांमध्ये अल्पसंतुष्ट असणाऱ्या असल्या मूर्ख पत्नीच्या मुळे,एक कुटुंब उद्ध्वस्त झालं,तर निराधार असणाऱ्या त्या मातेच ते तरुण लेकरू,सावज टिपल्या गेलेल्या नजरे मुळे वाह्यात,आपला तारुण्यातील कोवळ्या वयात जीव गमावून बसलं.नागरिकांच्या सुरक्षित ते कामी दिलेली वर्दी ही,व्यक्तिगत असंतोषाच्या पाटी दावणीला बांधल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांच्यासह अन्य पाच जणांना,आजन्म कारावासह व एका जणाला एक वर्षाचा कारावास भोगावा लागला.
कुटुंबातील नात्याला विश्वासाचा काळिमा फासणारे अशा अनेक हरामखोर अवलादी गाव गाड्या वरती शहरांमध्ये उपनगरा वरती बंदिस्त फ्लॅटमध्ये, अनेक कुटुंब प्रमुखांना,तडा,देताना दिसून येतात.
आणि मग अशा व्यक्तिगत स्वार्थासाठी,दुसऱ्याचे सावज टिपता टिपता, टिपणाऱ्याचा बळी देखील कधी घेतात हेच समजून येत नाही.अनैतिक संबंधाची,सुरुवात ही चांगली असते मात्र त्याचा शेवट हा अतिशय वाईट असतो. आडवळणाच्या शेतवाडी वरती,शहर उपनगरांमध्ये बांधलेल्या,हॉटेल वजा लॉजिंग वरती,एकाद्या मित्र-मैत्रिणीच्या रिकामा बंगला वा फ्लॅट वरती,अध्यात्मिक प्रवचन देणाऱ्या साधुसंतांच्या डेरेदाखल आश्रमावर ती,रेल्वे स्टेशनच्या फलाटावर ती,एसटी महामंडळाच्या बस स्थानकावर ती,भरगच्च असणाऱ्या सरकारी कार्यालयाच्या रिकाम्या दारावरती,अशा अनेक सावज,टिपणाऱ्या नजरा घुटमळत असतात,टिपून घेणाऱ्या सावजांचे साठी!..
.संबंधित खून प्रकरणाचा घटनाक्रम पुढील प्रमाणे- :आपला मुलगा सहा महिन्यापूर्वी,हरवला असल्याची फिर्याद कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री शिंदे यांच्याकडे, फिर्यादी महिला श्रीमती वैजंती सर्जेराव शिंदे वय 40 राहणार सातवी पैकी शिंदे वाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांनी 2008 रोजी दिली होती.फिर्यादी महिला हिने व्यक्त केलेल्या संशयानानुसार,आरोपी क्रमांक एक संपतराव पाटील,याने त्याची पत्नी सौ राणी उर्फ,वैशाली संपतराव पाटील,तसेच मृत झालेला मुलगा,किरण सर्जेराव शिंदे,राहणार सातवे पैकी शिंदेवाडी तालुका पन्हाळा,या दोघांचे मध्ये असलेल्या अनैतिक संबंधाचा बोभाटा होऊ नये अब्रू जाऊ नये बदनामी होऊ नये या हेतूने, खून झालेला तरुण युवक,किरण सर्जेराव शिंदे यांचा,अपहरण करून घातपात केला असल्याबद्दल चा संशय व्यक्त केल्याने,फिर्यादी महिलेच्या सांगण्यावरून,अंतिम तपासा अंतीदाखल झालेल्या मिसिंग केस मधून खूणाच्या तपासाच्या गंभीर गुन्ह्याची, उकल होण्यास पोलीस प्रशासननाला,मोठी मदत झाली.
यामुळे आरोपी संपतराव पाटील यास ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिंदे यांनी,त्यास जावक नंबर 344608 न्याय दिला.कराड पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी 2008 रोजी कराड शहर पोलीस ठाणे भाग51 गुन्हा नंबर 352 2008 ऑक्टोबर रोजी,भा.द.वी.स.क.364,34,302,201,342,कलमांतर्गत वरील आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करून, पंचनामे पुरावे साक्षीदार न्यायालयामध्ये सादर करून, वरील आरोपी पैकी 5 आरोपींना क्रमांक दोन,आरोपीची पत्नी,सौ राणी उर्फ वैशाली संपतराव पाटील यांची निर्दोष मुक्तता वगळता, अन्य पाच आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाकडून ठोठावण्यात आली, तसेच,आरोपी क्रमांक सहा यास एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
गुन्ह्यातील आरोपींची नावे खालील प्रमाणे आहेत.
1)-: संपतराव शामराव पाटील पोलिस निरीक्षक कल्याण,सातारा
.2)-: सौ राणी उर्फ वैशाली संपतराव पाटील, कोयना नगर वसाहत कराड.3)-; संदीप निवृत्ती नलवडे वय 32 राहणार पाडळी तालुका शिराळा4)-: अमोल तुकाराम रसाळ, वय,23 राहणार पाडळी तालुका शिराळा.5)-: संदेशवसंतराव पाटील, वय 39 राहणार पाडळी तालुका शिराळा6)-: सुरेश आनंदराव लोहार, वय 25, राहणार पाडळी तालुका शिराळा7)-: शैलेश वसंतराव पाटील,वय 34 राहणार पाडळी तालुका शिराळा…………………………………………..
या तपासकामी, फिर्यादी महिलेची मिसिंग तक्रार गांभीर्याने घेऊन, तपासाला योग्य दिशा देणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. शिंदे यांनी कोडोली पोलीस ठाणे, अंतर्गत सदर आरोपी ला जाग्यावरती बोलून घेऊन, गुन्ह्याची कबुली करून घेतली, याबाबत, प्रत्यक्ष गुन्हा कराड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने पुढील तपास कराड शहर पोलिस स्टेशन अंतर्गत वर्ग झाले ने, कराड शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री संभाजीराव पाटील यांनी तपास केलेल्या,सर्व परिणामास,न्यायालयासमोर आरोपींनी केलेल्या गंभीर गुन्हा बाबतचे,कृत्याचे सर्व सबळ पुरावे सादर करून, न्यायालयाने ठोठावलेल्या आरोपींना शिक्षा ठोठावण्याची कामे, तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजीराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
गुन्हा घडत असले ठिकाणी प्रत्यक्षदर्शी गुन्ह्याच्या सर्व भागांमध्ये सकृतदर्शनी कोणताही सहभाग नसल्याचे निदर्शनास आल्याने,सौ राणी उर्फ वैशाली पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली.
……………………………………………….
लेखन सहाय्य-श्री तानाजी सखाराम कांबळे.(कोल्हापूर)
सदरील लेखाची जबाबदारी ही उपरोक्त लेखकांच्या वाद-विवाद उद्भवल्यास त्यांच्या कार्यकक्षेत राहील.
………………………………………………….
मुख्य-संपादक-गणेश वायदंडे वृत्तवेग डिजिटल माध्यम समूह. सांगली.
………………………………………………….
(महाराष्ट्रातील लेखक, कवी, साहित्यिक यांचे विशेष लेख साहित्य प्रसारित करण्याकरिता वृत्तवेग डिजिटल माध्यम समूह.
मुख्य-संपादक गणेश वायदंडे.
संपर्क-९९७५३३९४३९
https://vruttvegnews.com
https://youtube.com/@vruttvegnews?si=Vq4z0iFP1xeHv-0h