
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी :
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
मिरजेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. समितीच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे प्राध्यापक अभिजीत आठवले, प्राध्यापक अविनाश जकाते, भास्कर जगताप, प्रमोद वायदंडे, प्रभाकर नाई, नितेश वाघमारे, राम कांबळे आणि संजय कांबळे यांनी महापुरुषांना अभिवादन केले.