
मिरज येथे लहुजी क्रांंती मोर्चा व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क-
रविवार दिनांक 30 मार्च 2025 मिरज आय एम ए हॉल या ठिकाणी लहुजी क्रांती मोर्चा व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले त्या शिबिराला मुख्य प्रशिक्षक म्हणून विकास पाथरीकर सर प्रदेशाध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा महाराष्ट्र परभणी तसेच या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटक म्हणून मातंग समाजातील तसेच बहुजन समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते विश्वास घस्ते आष्टा हे उद्घाटक म्हणून लाभले
तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये कुमार लोंढे माजी सहाय्यक आयुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका तसेच पा.यशया तालुरी सर, राम कांबळे सर जेष्ठ अभ्यासक सांगली तसेच संतोष आवळे जिल्हाध्यक्ष बामसेफ, निळकंठ देवकुळे जिल्हाध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा सांगली,प्राध्यापक लक्ष्मण मोरे,जितेंद्र हेगडे अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सांगली, तसेच डॉक्टर सदाशिव कांबळे सलगरे अजय घाटगे अध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा कोल्हापूर जिल्हा,एडवोकेट शिवाजीराव घाटगे,वंदना चंदनशिवे,कपिल आवळे,बबनजी साठे तसेच नंदा कांबळे मॅडम व सुजाता पवार मॅडम अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा व संयोजक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,प्राचार्य गौतम शिंगे,राजेंद्र धोत्रे , बळवंत लोखंडे,सचिन कांबळे सदाशिव वारे सर,राहुल थोरात,अवधूत टोमके,राम थोरात तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे आकाश चंदनशिवे, बिपिन मोहिते,महादेव साठे, राजकुमार आयगोळे,सतीश केंद्रे,जितेंद्र कांबळे, अविनाश साठे,नितीन तांदळे तसेच सर्व तालुका जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भीमराव बेंगलोरे आणि लहुजी क्रांती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष निळकंठ देवकुळे या सर्व कार्यकर्त्यांच्या व पदाधिकारी नेते यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण शिबिर पार पडले.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे समाजभूषण पुरस्कार 2025 याचेही वितरण मान्यवरांना करण्यात आले खालील प्रमाणे मान्यवर वस्ताद पै संजय अवघडे, जोंधळखिंडी,आकाश तिवडे,पैलवान हर्षवर्धन सकटे,डॉ उत्तम सकट,
सुनीता रणीकर,शेवंताताई वाघमारे,दीक्षा प्रशांत रणधीर,
जहांगीर मोरे,प्रेमा ऐवळे,लताताई तंगडी,बबनदादा आवळे,एडवोकेट शिवाजीराव घाटगे,
अश्विनकुमार भोरे उर्फ जीवनलाल , S V बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मिरज.लोकसेवा फाउंडेशन मिरज,डॉ.लीला भिंगारदिवे,दादासाहेब कस्तुरे, अमित कांबळे,सदाशिव फाळके,विनायक हेगडे व परशुराम लोंढे याना पुरस्कार ने सन्मानित करण्यात.
तसेच पञकार गणेश वायंदडे,अरुण लोंढे,रविद्र कांबळे,गणेश आवळे,गणेश वायकर याना त्यांच्या पञकारिता करिता निर्भीड पञकार म्हणून सन्मानित करण्यात आले.

