
ब्रेकिंग-बारामतीत विमान दुर्घटना : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू – डीजीसीएची प्राथमिक माहिती
दैनिक वृत्तवेग-बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीच्या गोजू बावी परिसरात लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डीजीसीएकडून मिळत आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे.आज अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर येत होते.
विमान लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून विमान धावपट्टीजवळ कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, आरोग्य विभाग आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना दूर ठेवण्यात येत आहे.डीजीसीएच्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र अंतिम आकडेवारी आणि अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.राज्यभरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
