
नेरूळ मुंबई येथे झालेल्या पाचव्या इंटरनॅशनल योगासन स्पर्धेमध्ये मिरजेच्या राजवर्धन रणधीर मोरेचा प्रथम क्रमांक :
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
नेरूळ मुंबई येथे झालेल्या पाचव्या इंटरनॅशनल योगासन स्पर्धेमध्ये मिरजेच्या राजवर्धन रणधीर मोरेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेरूळ मुंबई येथे आर्ट ऑफ लर्निग असोसिएशन तर्फे झालेल्या पाचव्या इंटरनॅशनल योगासन स्पर्धेमध्ये केळकर योग वर्गाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
अंडर 8 मुले मध्ये वरद सुतार चा प्रथम क्रमांक आलाय. तर श्रीवर्धन मगदूम चा – तृतीय क्रमांक आलाय. तर अंडर 8 मुली मध्ये मिथिला पाटीलचा आणि इशानी देशपांडेचा द्वितीय क्रमांक आला आहे.
अंडर 8 ते 13 मुले मध्ये तन्मय पवार प्रथम, श्रीअंश सावंत तृतीय, तर अंडर 8 ते 13 मुली मध्ये इशिता पाटील प्रथम, आणि सावनी जाविर चतुर्थ क्रमांक आलाय. अंडर 14 ते 18 मुली सई पाटील प्रथम, अंडर 14 ते 18 मुले राजवर्धन मोरे प्रथम, अंडर 18 ते 30 मुली मध्ये तनिष्का गुजर प्रथम क्रमांक आला आहे. या व्यतिरिक्त वरद सुतार, ईशानी देशपांडे , मिथिला पाटील , इशिता पाटील, राजवर्धन मोरे, सई पाटील, तनिष्का गुजर यांनी champion of champion हा पुरस्कार मिळवला आहे.वरील खेळाडूंना दिपक दुर्गाडे, सौ.कोमल जगताप, प्रतिष्ठा माने, कुणाल शिंदे यांचे प्रशिक्षण आणि डॉ. मुकुंदराव पाठक, सौ. अंजली केळकर, श्री. मोहन जोशी, श्री. सुधीर नाईक यांचे मार्गदर्शन मिळाले.
