
पप्पा सांगा कोणाचे?अरुण सरनाईक यांच्या जीवन चरित्र पटावरील माहितीपटाचेप्रीमियर शो संपन्न.
प्रमुख पाहुणे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उपस्थिती.
कोल्हापूर दिनांक 22 विशेष प्रतिनिधी दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क
सिनेमाचा पडदा असो की नाटकाचा रंगमंच प्रत्येक ठिकाणी आपल्या कसदार अभिनयाने व्यक्तिरेखा अजरामर करणाऱ्या अभिनयासोबतच ढोलकी,तबला हार्मोनियम या वादनात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले आणि वडिलांच्या गायकीचा वारसा जोपासताना जीवनाचा प्रवास सुरेल बनविणारा वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा चतुरस्त्र अभिनेता म्हणजे अरुण सरनाईक.

कोल्हापूरचे सुपुत्र असणारे अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर माहिती चित्रपटाची निर्मिती त्यांच्या कन्या डॉक्टर सविता सरनाईक- नाईकनवरे यांनी केली आहे केली “पप्पा सांगा कोणाचे” या माहितीपटाचा प्रीमियर शो गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृह मध्ये झाला या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची गर्दी झाली होती.

हा कार्यक्रम खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री प्रकाश अबिटकर ,खासदार धनंजय महाडिक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या विशेष उपस्थित संपन्न झाला.

यावेळी दिग्दर्शक संतोष पाठारे ,निर्मात्या डॉक्टर सविता नाईकनवरे, बांधकाम व्यवसाय रणजित नाईकनवरे आदी रसिक मान्यवर उपस्थित होते.
