
छगन भुजबळ यांनी आज राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-मुंबई प्रतिनिधी.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेताच भुजबळ समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. विशेष म्हणजे नाशिकच्या भुजबळ फॉर्मवर समर्थकांचा मोठा जल्लोष पाहावयास मिळत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी उघडपणे आपली नाराजी अनेक वेळा व्यक्त केली होती. आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. सुनील तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीची एक जागा रिक्त होती. त्या जागेवर छगन भुजबळ यांना संधी दिल्याचे सांगितले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.
