
स्वभाव, शांत, संयमी, मनमिळावू : आक्रमकता मात्र, ती लेखणीतच …. अभ्यासू, संशोधक, शोध पत्रकारिता करणारे वरिष्ठ उपसंपादक अविनाश कोळी बनले लोकमतचे सांगली जिल्हा आवृत्ती प्रमुख : मिरजेचे सुपुत्र, डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी :
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
रविंद्र कांबळे
सांगली जिल्ह्याच्या पत्रकारितेत गेली सत्तावीस वर्ष कार्यरत असणारे दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक अविनाश कोळी यांची दैनिक लोकमतच्या सांगली आवृत्ती प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अविनाश कोळी यांचा स्वभाव शांत, संयमी, मनमिळावू...आक्रमकता मात्र, ती फक्त लेखणीत आहे. अभ्यासू, संशोधक, शोध पत्रकारिता करणारे पत्रकार अविनाश कोळी यांनी शेती, पाणी, राजकारण, शिक्षण, उद्योग, क्रीडा यासारख्या विविध विषयावर अभ्यासपूर्ण लिखाण केल आहे. विश्लेषणात्मक पत्रकारिता करण्यामध्ये मातब्बर, त्याचप्रमाणे अग्रेसर असणारे पत्रकार म्हणून अविनाश कोळी यांची ख्याती आहे. पत्रकारितेतील आपल्या कार्यकर्तृत्वामुळे तरुण वयात आवृत्तीप्रमुख सारख्या मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.
मिरजेचे सुपुत्र असणारे अविनाश कोळी यांचे शालेय शिक्षण विद्यामंदिर आणि महाविद्यालयीन शिक्षण हे मिरजेतील शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालयात झाले. तर वृत्तपत्र पत्रकारितेची पदवी त्यांनी टिळक विद्यापीठात घेतली आहे. वडिलांच्या निधना नंतर प्रतिकूल परिस्थितवर मात करून त्यांनी यशस्वी वाटचाल केली आहे. पत्रकारिता करत असतानाच पत्रकार संघटनेच्या माध्यमातुन पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. अविनाश कोळी हे उत्कृष्ट खेळाडू, नियमित व्यायाम करून उत्तम शरीरयष्टी,आरोग्य असलेले व्यक्तिमत्व आहे.
अविनाश कोळी हे 1998 पासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. या पूर्वी दैनिक सामना, तरुण भारत, महासत्ता या दैनिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केल आहे. अविनाश कोळी हे 2003 पासून दैनिक लोकमत मध्ये पत्रकारिता करतात. दैनिक लोकमत मध्ये पत्रकार, उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक या पदावर त्यांनी काम केलं आहे. अविनाश कोळी यांची दैनिक लोकमतच्या सांगली आवृत्ती प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दैनिक लोकमत नूतन सांगली जिल्हा आवृत्तीप्रमुख अविनाश कोळी यांना भावी वाटचालीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा......