
कुमारी तनुश्री दावणे चे महावाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक घेऊन घावघवीत यश
सांगली जिल्ह्यात बेथेसदा स्कूलचे नाव लौकिक केल्याबद्दल सर्वत्र होत आहे कौतुक.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क: प्रतिनिधी मनोज कांबळे. मिरज.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच झालेल्या महावाचन स्पर्धेत बेथेसदा शाळेमधील चौथी वर्गात शिकत असणारी कु. तनुश्री दीपक दावणे हिने जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. तनुश्री ही मुंबईचे दैनिक वृत्तवेग पत्रकार दिपक उर्फ रॉबर्ट दावणे यांची कन्या असून काही वर्षापासून हे कुटुंब मिरजमध्ये स्थायिक आहे.तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे शाळेचे प्रिन्सिपल सर्व शिक्षक वर्ग स्टाप यांच्याकडून कौतुक करण्यात आले.
