कुपवाड च्या सिद्धि मेलशंकरे चे चित्रकला स्पर्धेत सुयश

Spread the love

कुपवाड च्या सिद्धि मेलशंकरे चे चित्रकला स्पर्धेत सुयश

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क: प्रतिनिधी-मनोज कांबळे.

कुपवाड

कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मार्फत आयोजित फळ महोत्सव चित्रकला स्पर्धेत कुपवाड (ता. मिरज) येथील नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सिद्धि सदाशिव मेलशंकरे इ.८वी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिला रोख रक्कम 2001 रुपयाचे बक्षीस, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देण्यात आले.

महाशिवरात्री व द्राक्ष दिनानिमित्त जिल्हास्तरीय फळ महोत्सव चित्रकला स्पर्धाचे आयोजित करण्यात आले होते या स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आल्या. विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देण्यात आले. विद्यार्थिनीला संस्थेचे संस्थापक मा.आण्णासो उपाध्ये सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.जी. चिरमे सर, पर्यवेक्षक श्री. ए. एम. चौगुले सर यांचे प्रोत्साहन व कलाशिक्षक श्री.एच,जे,मोहिते सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सिद्धी मेलशंकरे हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *