
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क: पुणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने (बार्टी) राज्यातील अनुसूचित जातींमधील युवक-युवतींसाठी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हा अडीच महिन्यांचा प्रमाणपत्र कोर्स राबविण्यात येणार आहे.माहिती-तंत्रज्ञान विभागात मागील काही वर्षांपासून झपाट्याने बदल होत आहेत. बदलत चाललेली शिक्षण पद्धती आणि त्याला अत्याधुनिक पद्धतीची मिळालेली जोड यामुळे युवक आणि युवतींना रोजगारक्षम शिक्षण घेणे अतिशय गरजेचे बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन बार्टीन एआय हा प्रमाणपत्र प्रशिक्षण कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कोर्समुळे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसह इतर विभागांतही रोजगार मिळणे सुकर होणार आहे. या कोर्समुळे विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण आणि वृद्धीकरण होण्यास मदत मिळणार आहे.
अडीच महिन्यांचा असेल एआय प्रमाणपत्र कोर्स २५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे१८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांसाठी असेलगुणवत्तेच्या निकषांवर, पात्र अर्जाची छाननीनिवडक विद्यार्थ्यांची परीक्षा किंवा मुलाखतपात्र उमेदवारांची यादी बार्टीच्या संकेतस्थळावरकोर्ससाठी विद्यार्थ्यांना महिन्याला चार हजार रुपये विद्यावेतन
या जिल्ह्यांत होणार केंद्रेराज्य शासनाच्या कृषी वित्त महामंडळ लिमिटेड (ए.एफ.सी. इंडिया लि.) या संस्थेच्या वतीने हा कोर्स छत्रपती संभाजीनगर, परतूर, जालना, चिखली (बुलडाणा), सिंदखेड राजा (बुलडाणा), वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, परभणी, भंडारदरा, निगडी, पिंपरी-चिंचवड, गोखलेनगर (पुणे), सोलापूर, लातूर, राहुरी, राजुरी, नेरळ, रायगड, कर्जत, रोहा, नाशिक, कोल्हापूर, धुळे, पंचवटी (नाशिक), सांगली या केंद्रांवर सुरू होणार आहे.
काळाच्या ओघात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड असणे अतिशय गरजेचे बनले आहे. त्यासाठीच बार्टीच्या वतीने एआय हा प्रमाणपत्र प्रशिक्षण कोर्स सुरू करण्यात येत आहे. याचा लाभ रोजगारक्षम युवकांना नक्कीच होईल. – सुनील वारे, महासंचालक, बार्टी पुणे.