बेडग येथे समर्थ आश्रम शाळेत १८ विद्यार्थ्यांना कावीळ ची लागण.

Spread the love

मिरज : बेडग (ता. मिरज) येथील बेडग समर्थ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना काविळीची लागण झाल्याची घटना घडली आहे. मिरज शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात विद्यार्थ्यांना दाखल केले आहे.

बेडग-मालगाव रस्त्यावरील समर्थ अनिवासी शाळेमध्ये पहिली ते दहावी या वर्गात 480 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 14 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना उलटी, जुलाब, तसेच ताप येण्याची लक्षणे दिसू लागली होती. दि. 27 रोजी या शाळेतील 10 ते 15 वयोगटातील सतरा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर बनल्याने मिरज शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले. सध्या शासकीय रुग्णालय येथे सहा, तसेच इतर खासगी रुग्णालयांमध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. ही माहिती संस्थेचे संचालक अशोक ओमासे यांनी दिली आहे.

दूषित पाणीपुरवठा

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाणीपुरवठा झाल्याने मुलांना काविळीची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार, तसेच शाळेतील स्वच्छता, स्वच्छ पाणीपुरवठा हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *