निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी एज्युकेशन सेंटर, मिरज येथे “ऑटिस्टिक प्राईड डे” उत्साहात साजरा.

Spread the love

निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी एज्युकेशन सेंटर, मिरज येथे “ऑटिस्टिक प्राईड डे” उत्साहात साजरा

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे

“वेगळेपणा म्हणजेच कमतरता नाही – ती एक वेगळी क्षमता आहे”, या विचाराने प्रेरित होऊन निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी सेंटर, मिरज येथे ऑटिस्टिक प्राईड डे उत्साहात, आनंदमय आणि जाणीवपूर्वक साजरा करण्यात आला.या विशेष दिवशी संस्थापक डॉ. चंद्रशेखर हळिंगळे सर,सह-संस्थापिका डॉ. निशा हळिंगळे मॅडम, तसेच केंद्राच्या प्रमुख आणि डॉ. माधुरी वांगपाटी मॅडम हे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर डॉ. माधुरी वांगपाटी मॅडम यांनी ऑटिस्टिक प्राईड डे विषयी सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “ऑटिझम ही आजार नसून एक न्यूरो-डेव्हलपमेंटल अवस्था आहे.

समाजाने या मुलांकडे करुणेने नाही, तर समजून घेण्याच्या दृष्टीने पाहायला हवे. त्यांच्यातील विशेष कौशल्ये ओळखणे आणि त्या कौशल्यांना योग्य दिशा देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”यानंतर डॉ. निशा हळिंगळे मॅडम यांनी सध्याच्या काळात ऑटिझमचे प्रमाण वाढत चालले आहे यावर प्रकाश टाकला. त्यांनी निदान, प्रारंभिक हस्तक्षेप (Early Intervention), व्यावसायिक थेरपी, स्पीच थेरपी, वर्तनात्मक उपचार यासारख्या उपचारपद्धतींबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर पालकांनी धैर्य ठेवून समजूतदारपणाने मुलांना मदत करावी, असा सल्लाही दिला.डॉ. चंद्रशेखर हळिंगळे सर यांनी आपल्या अनुभवातून पालकांशी संवाद साधत सांगितले की, “ऑटिझम असलेली मुले प्रेम, मार्गदर्शन आणि समर्थनाच्या माध्यमातून खूप मोठे यश मिळवू शकतात. योग्य वेळेस उपचार आणि समुपदेशन दिल्यास त्यांच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास निर्माण होतो.

”या कार्यक्रमात पालकांनी देखील आपल्या अनुभवांचे, अडचणींचे आणि प्रवासाचे कथन केले, जे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. विद्यार्थ्यांनी थोडी नृत्य सादरीकरण, चित्रप्रदर्शन आणि विविध खेळांद्वारे आपले कौशल्य दाखवले, ज्यामुळे सर्व उपस्थितांचे मन जिंकले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित डॉक्टर, थेरपिस्ट, पालक आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण वातावरण आनंददायी, प्रेरणादायी आणि सकारात्मक उर्जेने भरलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *