
“भाची कडुन अशोक मामांचं खास कौतुक.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क :-
स्वतःचा मामा आपल्या विमानात बसलेला आणि त्यांना संपूर्ण प्रवाशांसमोर गौरवाचं स्थान देणं…हा क्षण फक्त कौटुंबिक नाही, तो भारतीय सिनेमा आणि कलेसाठीही अभिमानास्पद “भाची कडुन अशोक मामांचं खास कौतुक”दिल्ली-मुंबई फ्लाइटमध्ये अनमोल क्षण…पद्मश्री मिळाल्यानंतरचा हा एक हृदयस्पर्शी क्षण…जेव्हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ एका विमानात होते —आणि त्या विमानातच अनाउन्समेंट झाली…🎤 “पद्मश्री अशोक सराफ आमच्या विमानात आहेत… त्यांच्या अभिनयाचं योगदान अमूल्य आहे.”ही अनाउन्समेंट कोणी केली माहिती आहे?
स्वतः त्यांच्या भाचीने — पायलट अदिती परांजपेने!अदिती ही निवेदिता सराफ यांच्या सख्ख्या बहिणीची मुलगी.अशोक सराफ यांनीही उठून सर्व प्रवाशांचे हात जोडून कृतज्ञतेनं आभार मानले.एक क्षण — जो नाट्यगृहाबाहेर घडलेला पण रंगभूमीइतकाच भारावलेला होता.
