श्री क्षेत्र जोतिबा मंदिर (कोल्हापूर) येथील सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी २५९ कोटी ५९ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता..!

Spread the love

श्री क्षेत्र जोतिबा मंदिर (कोल्हापूर) येथील सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी २५९ कोटी ५९ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता..!

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- कोल्हापूर प्रतिनिधी

लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर (कोल्हापूर) येथील सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी २५९ कोटी ५९ लाख रुपये खर्चास नियोजन विभागाच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा शासन निर्णय आज (दि. २८ मे) नियोजन विभागानं जारी केला आहे. या विकास आराखड्यातील अंमलबजावणी व संनियंत्रणाची जबाबदारी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. श्री क्षेत्र जोतिबा हे राज्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक श्रद्धास्थान असून त्याचा विकास करण्यासाठी शासनानं विविध पातळ्यांवर व्यापक विचार करून आराखडा तयार केला आहे.

या विकास आराखड्याअंतर्गत श्री जोतिबा मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणं, यमाई मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणं, श्री जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण करणं, श्री जोतिबा डोंगर कड्यांचं संवर्धन करणं, देवस्थान समिती/प्राधिकरण नवीन कार्यालय बांधणं, श्री जोतिबा डोंगरावर दोन ठिकाणी ज्योत स्तंभाची निर्मिती करणं, श्री जोतिबा डोंगरावर नवे तळे परिसर विकास करणं, श्री जोतिबा डोंगरावर केदार विजय गार्डन निर्मिती करणं, श्री जोतिबा डोंगरावर यमाई परिसर विकास (चाफेवन) करणं, श्री जोतिबा डोंगरावर कर्पूर तलाव संवर्धन करणं, श्री जोतिबा डोंगरावर चव्हाण तलाव संवर्धन करणं, श्री जोतिबा डोंगरावर मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन करणं, श्री जोतिबा डोंगरावर ऐतिहासिक अंगारकर वाडा व बाब संवर्धन करणं, श्री जोतिबा डोंगरावर वाहनाकरिता पार्किंग व्यवस्था करणं, श्री जोतिबा डोंगरावर पाणपोई व शौचालय बांधणं आदी बाबींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *