
थांग-ता मार्शल आर्ट खेळामधून 7व्या खेलो इंडिया युथ गेम मध्ये सावळीच्या वैभव माळी ला रौप्य पदक
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क-
जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.
दि. १२ मे ते १४ मे गया (बिहार) येथे झालेल्या 7व्या खेलो इंडिया युथ गेम मध्ये महाराष्ट्रातून 5 खेळाडूंची निवड झाली होती यामध्ये ALMS-VSPM व विवेकानंद क्रीडा प्रबोधिनी, सावळी संचलित थांग ता खेलो इंडिया अकॅडमी सांगली च्या वैभव शरद माळी, अपेक्षा बसवराज मांग व श्रुती संजय चव्हाण अश्या तीन खेळाडूंची निवड झाली होती तसेच सातारा जिल्ह्यातून तनिष्का कुंभार व गणेश पाटोळे ह्या दोन खेळाडूंची निवड झाली होती.
दरम्यान सावळीच्या वैभव शरद माळी याने रौप्य पदक, अपेक्षा बसवराज मांग व तनिष्का कुंभार यांनी कांस्य पदक पटकावले..


वरील खेळाडूंना ऑल महाराष्ट्र थांग ता असोसिएशन चे सचिव श्री महावीर धुळधर सर, अध्यक्ष श्री मुकुंद धुळधर सर, व सर्व संचालक,राष्ट्रीय प्रशिक्षक सौ रुपाली जहागीरदार तर संघ व्यवस्थापक श्री गणेश पडवले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच थांग-ता खेलो इंडिया अकॅडेमी चे प्रशिक्षक मनोज कांडकर यांचे ही मार्गदर्शन लाभले.



आज सावळी मध्ये वैभव माळीचा स्वागत तथा सत्कार समारंभ पार पडला यावेळी गावचे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ सन्मती गणे, माझी उप सरपंच रोहित तांबडे, सदस्य बजरंग माळी.तसेच माळी समाजाचे अध्यक्ष मोहन माळी, कुमार माळी, भरत शिंदे, गिरीश शिंदे, आकाश माळी, विशाल मोहिते,वैभव चे आई वडील,सर्व नातेवाईक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते यांच्या सर्वांच्या उपस्थिती झाला.
यावेळी सावळीमधील जानकार राजकरणी, नेते मंडळी या कार्यक्रमामध्ये उपस्थित नसतानाही वैभव माळीचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
