सावळी गायरानमधील तळ्यातून गौण खनिज गायब.

Spread the love

सावळी गायरानमधील तळ्यातून गौण खनिज गायब

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.

सावळी गावातून बेकायदेशीर रित्या गौण खनिज चोरीला गेल्याचा प्रकार घडला. सावळी येथील गायरान गट नंबर १७६ मधील तळ्यातून गौण खनिज बेकायदेशीर उत्खनन झाले.
तळ्याच्या मध्यभागी गौण खनिज अज्ञातांनी जेसीबी,डंपर लावून चोरले आहे.
तळ्याच्या भोवती असणारा संरक्षक कठडा (बांध) तोडण्यात आला असून बांध पूर्णपणे चोरीला गेल्यामुळे हा प्रकार घडला आहे.


या घटनेचे निवेदन मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मॅडम यांना देण्यात आले व या घटनेची सखोल चौकशी व्हावी, या घटनेचा जलद गतीने पंचनामा करण्यात यावा. व दोषींना कठोरात-कठोर शासन व्हावे
असे विनंती करण्यात आली. तहसीलदार मॅडम यांनी देखील
कारवाईचे करू आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित माजी डेपुटी सरपंच सचिन मोरे सामाजिक कार्यकर्ते नायकु पवार,रोहित पाटील,परशुराम जाधव,रमेश चौगुले,दिनकर पवार,रावसाहेब नाईक,अनिल लोंढे
रवींद्र साळुंखे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *