सांगली जिल्ह्यात खुणाचा सपाटा चालूचसांगली सह्याद्रीनगर मध्ये भर दिवसा खून (हल्ल्याचे कारण अस्पष्ट)

Spread the love

सांगली जिल्ह्यात खुणाचा सपाटा चालूचसांगली सह्याद्रीनगर मध्ये भर दिवसा खून(हल्ल्याचे कारण अस्पष्ट)

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्कजिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे

सांगली जिल्ह्यात खुणाचा सपाटा चालूच आहे.गुन्हेगारीने जिल्ह्यात थैमान घातले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाची दहशत कमी पडत आहे. असे दिसुन येत आहे. गुन्हेगारांना चांगली चपराक बसली पाहिजे अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.आज दुपारी सांगली मधील रेकॉर्डवरील तरुणाचा दिवसा- ढवळ्या खून करण्यात आला.

आठ ते दहा हल्लेखोरांनी हे दहशत मजवत तरुणाचा खुन केल्याचे कृत्य घडले.आज सांगलीच्या सह्याद्रीनगरात भर दुपारी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाला आहे. मुबारक उर्फ(फुलवा) हसीनउल्ला शहा (वय 30) रा. अहिल्यानगर असे या खुन झालेल्या युवकाचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. ही खुणाची घटना सह्याद्रीनगर नमराह मस्जिद समोर घडली आहे. दुपारी 4 च्या सुमारास आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एकटा सापडलेल्या तरुणाचा चाकूने वार करीत खून केला

. – घटनास्थळी संजयनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले असून संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक विमला एम आणि एलसीबी प्रमुख सतीश शिंदे, सपोनि किरण स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली. या हल्ल्याचे कारण अस्पष्ट आहे.तरी या घटनेने सांगली शहरात खलबळ माजली आहे. व असे दिवसाढवळ्या खून होत असतील तर पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *