१ मे महाराष्ट्र दिनी सांगली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानवंदना.

Spread the love

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त सांगली पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. तसेच, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करुन अभिनंदन करण्यात आले. तसेच, पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा ही गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *