
मिरज बस स्टॅन्ड जवळ अपघात- अशोका ट्रॅव्हल्स च्या मागील चाकात एका इसमाच्या पायाचा चुराडा.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-प्रतिनिधी लखन लोंढे.
मिरज बस स्टॅन्ड समोर किरण हॉटेल शेजारी एका बेरोजगारी युवकाच्या पायावरून अशोका ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक MP 13 ZL 2799 याचा अपघात झाला. ही गाडी रस्त्याने जात असताना तिथेच चालत फिरणाऱ्या एका व्यक्तीच्या पायावरून गाडीचे मागील दोन चाक गेल्याने पायाचा चेंदा-मेंदा होऊन चुराडा झाला.घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी त्या व्यक्तीस इस्पितळात दाखल केले.



