जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावजी खोतवाडी येथे राष्ट्रीय योग दिन उत्साहाने संपन्न.

Spread the love

जिल्हा परिषद प्राथमिक शाळाकावजी खोतवाडी येथेराष्ट्रीय योग दिन उत्साहाने संपन्न.

“आनंददायी उपक्रम” विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवणारी शाळा म्हणून परिसरामध्ये शाळेची दखल.

————————————————-

दैनिक वृत्तवेग,मिरज- दिनांक 23 जून 2025 दैनिक वृत्तवेग डिजिटल माध्यम,क्रीडा प्रतिनिधीwww.vruttvegnews.comआमच्या डिजिटल वेबसाईट वयुट्युब चॅनेल ला अवश्य भेट द्या.

————————————————-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावजी खोतवाडी तालुका मिरज,जिल्हा सांगलीयांचे वतीने नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेमध्ये विद्यार्थ्यासमवेत संपन्न झाला.या शाळेतील विद्यार्थी नेहमीविविध व वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामध्ये भरभरून सहभाग नोंदवतात.

राष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून शाळेच्या पटांगणामध्ये विद्यार्थ्यांनीविविध प्रकारच्या योगसाधनेचा व्यायाम नेहमी करून घेतात.यासाठी विशेष परिश्रम शिक्षिका श्रीम.अर्चना महिपती धनवडे यांनी घेतले.शिक्षिका श्रीम.धनवडे यांनी योगाचे प्रकार त्यातून निर्माण होणारी ऊर्जा व्यायाममुळे मिळणारे शारीरिक फायदे याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे विविध प्रकारची योगासने उपस्थित विद्यार्थी यांचे समवेत करून घेतले. शाळेतील विद्यार्थी नियमितपणे पोषण युक्त आहार घेतात तसेच शारीरिक व्यायामाचे प्रकार आणि प्राणायाम दररोज करतात.

यासाठी शिक्षिका श्रीम.अर्चना माहिपती धनवडे वमुख्याध्यापक श्रीमती शितल दत्तात्रय सवाईराम शिक्षक श्री .माणिकशहा मुबारक जमादार शिक्षक श्रीम .रिनाज माणिकशहा जमादार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

योग दिनानिमित्त शाळेच्या पटांगणामध्ये,बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपली उपस्थिती योग दिनामध्ये सहभाग घेऊन नोंदवली. यामुळे पालकाकडून शाळा व्यवस्थापनाचे व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *