गांधीनगरात पावणे दोन कोटी चोरले, गोव्यात जाऊन १२ लाख उडवले; चौघांना अटक.

Spread the love

गांधीनगरात पावणे दोन कोटी चोरले, गोव्यात जाऊन १२ लाख उडवले; चौघांना अटक.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- प्रतिनिधी कोल्हापूर:-

गुडलक स्टेशनरी चे मालक प्रकाश वाधवाणी यांच्या गोडाऊनमधील टेम्पोतून १ कोटी ९० लाखांची रक्कम चोरून पळालेल्या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. १७) अटक केली. एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ कोटी ७८ लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली.

शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री रक्कम चोरून पळालेल्या पाचजणांनी गोव्यात जाऊन कॅसिनोमध्ये १२ लाख रुपये उडवले.योगेश किरण पडळकर (३०), सम्राट संजय शेळके (२४), स्वरूप संजय शेळके (२२, तिघे रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) आणि स्वयम सचिन सावंत (१९, रा. बुधवार पेठ, कोल्हापूर) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत, तर राजेंद्रनगरातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्ह्याच्या तपासाबाबत माहिती दिली.

लक्षतीर्थ वसाहतीमधील योगेश पडळकर याने त्याच्या साथीदारांसह गांधीनगर (ता. करवीर) येथे चोरी केल्याची माहिती उपनिरीक्षक संतोष गळवे आणि अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती. संशयित चोरटे हॉकी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच सोमवारी सायंकाळी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.अधिक चौकशीत त्यांनी एक कोटी ९० लाखांची रोकड चोरल्याची कबुली दिली. चोरलेली रक्कम त्यांनी बुधवार पेठेत स्वयम सावंत याच्या घरी ठेवली होती. १ कोटी ७८ लाखांची रोकड, गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी आणि ३ मोबाइल असा १ कोटी ७९ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.अल्पवयीन मुलाच्या घरात बसून चोरीचा कटपोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील सम्राट शेळके याचा भाऊ स्वरूप हा गुडलक स्टेशनरीमध्ये कामाला होता.

दिवसभर आलेले पैसे कुठे ठेवले जातात याची त्याला माहिती होती. एक महिन्यापूर्वी राजेंद्रनगर येथे अल्पवयीन मित्राच्या घरात बसून पाच जणांनी गुडलक स्टेशनरीमध्ये चोरी करण्याचा कट रचला. स्टेशनरीमधील कर्मचारी कैलास गोरड यांनी गोडाऊनमधील एका टेम्पोच्या डॅशबोर्डमधील कप्प्यात पैसे ठेवल्याची माहिती स्वरूप शेळके याने शुक्रवारी रात्री त्याच्या मित्रांना दिली. त्यानुसार इतर चौघांनी दोन दुचाकींवरून जाऊन गुडलक स्टेशनरीच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर टेम्पोच्या काचा फोडून पैशांचे पोते घेऊन निघून गेले. चोरी करायला जाताना ते एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले.दोन दिवसांत १२ लाखांची मौजमजाचोरलेले पैशांचे पोते बुधवार पेठेतील घरी लपवून अल्पवयीन मुलासह स्वयम सावंत आणि योगेश पडळकर हे तिघे गोव्याला गेले. त्यांनी दोन दिवसांत कॅसिनोमध्ये तब्बल १२ लाख रुपये उडवले.

यातील काही रक्कम त्यांनी आणखी कोणाला दिली आहे काय, याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.मोठा हात मारण्यासाठी..या टोळीतील स्वयम सावंत याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. कामधंदा करीत नसल्याने या सगळ्यांकडे पैशांची चणचण होती. चैनीसाठी मोठा हात मारण्याचे नियोजन ते अनेक दिवसांपासून करीत होते. अखेर मोठा हात मारला आणि तीन दिवसांत ते पोलिसांच्या हाती लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *