लाडक्या बहिणींसाठी महायुतीची कसरत.

Spread the love

लाडक्या बहिणींसाठी महायुतीची कसरत.

अनुसूचित जातींचा ४१० कोटींचा निधी वळवला.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मे महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला ४१० कोटी ३० लाख रुपये निधी वळविण्यास गुरुवारी राज्य सरकारने मंजुरी दिली.सामाजिक न्याय विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी ३९६० कोटी रुपये राखून ठेवले असून, त्यातील ४१० कोटी रुपये गुरुवारी महिला व बालविकास विभागाकडे वळते करण्यात आले.

मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी हा निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यास महिला व बालविकास विभागाने तातडीने मंजुरीही दिली. संजय गांधीअनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अर्थसाह्य मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार नाहीत, याची काळजी महिला व बालविकास विभागाने घ्यावी, अशी सूचना सामाजिक न्याय विभागाने केली आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान या योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये करण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती; परंतु १५०० रुपयांचा हप्ता देण्यासाठीच सरकारची त्रेधा उडत आहे.३९६० कोटी रुपये’लाडकी बहीण’साठी सामाजिक न्याय विभागाने ठेवलेला निधी.४१० कोटी रुपयेपाच जून रोजी वळता केलेला निधी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *