
सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे अँटी करप्शनच्या जाळ्यात : बांधकाम परवान्यासाठी सात लाख रुपयाची मागितली लाच :
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- सांगली जिल्हा प्रतिनिधी-प्रशांत कदम
सांगली,मिरज,आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. सांगली मधील २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवाना देण्याकरिता तब्बल दहा लाखाची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर सात लाख रुपयाची लाच घेण्याचे निश्चित झाले होते. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती, त्यानुसार सापळा रचून उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेचा मोठा अधिकारी लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडल्यामुळे महापालिका क्षेत्रात खळबळ माजली आहे.
ही हाय प्रोफाईल केस असल्याने मुंबईतून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रथक येऊन कारवाई केली आहे.माजी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नावाचा देखील फिर्यादीत उल्लेख झाल्याने खळबळ झाली आहेआय एम एस अधिकारी गुप्ता यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का याबद्दल चर्चा आहे.
यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, पोलीस उपाध्यक्ष अनिल कटके, पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, किशोर कुमार खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडनीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव आणि विना जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.
