गगनबावडा येथे एम.आय.डी.सी साठी जागेची पाहणी.

Spread the love

गगनबावडा येथे एम.आय.डी.सी साठी जागेची पाहणी

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:- गगनबावडा-प्रतिनिधी

गगनबावडा येथे मिनी एम.आय.डी.सी व्हावी ही गेली कित्येक वर्षे गगनबावडा तालुका कला मंच व ग्रामस्थांच्या वतीने मागणी होत आहे.

आज मा. आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या निर्देशानुसार एम.आय.डी.सी साठी लागणाऱ्या जागेची पाहणी श्री.उमेश देशमुख (प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर) श्री.इराप्पा नाईक (कार्यकारी अभियंता) सुसेन कापरे (सहाय्यक जिल्हा निरीक्षक भूमिअभिलेख) यांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी गगनबावडा सरपंच सौ. मानसी कांबळे, उपसरपंच श्री.संतोष गावडे, सदस्या सौ. वृंदा पाध्ये, गगनबावडा तालुका कला मंचचे अध्यक्ष श्री.विनोद प्रभुलकर, ग्रामसेवक श्री. दिलीप डवरी श्री.गुरुनाथ कांबळे, श्री.शाहबुद्दीन डांगे, श्री.विजय परीट, श्री. जावेद आत्तार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *