
मिरजेचे छत्रपती शिवाजी स्टेडीयम चे नाव आदरपूर्वक लिहिण्या बाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश तोडकर यांची पोस्ट होत आहे व्हायरल.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
मिरज प्रतिनिधी
मिरजेतील सामान्य कार्यकर्ता गणेश तोडकर हे मिरजेच्या विविध प्रश्नावर करताना दिसत आहे. मिरजेतील रस्त, स्वछता व अन्य प्रश्नांवर ते आपल्या वेगळ्या स्टाईल ने विषयांना वाचा फोडतात.
आज त्यांनी टाकलेल्या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की,
मिरजेत श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम आहे .
काही दिवसा पुर्वी या मैदानात गेलो असता . तेथे असे लक्षात आले कि पूर्वी साधारण 10 वर्षापूर्वी ” श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम ” असे तिथे नाव होते . महानगर पालिकेने तीथे सामने भरवायला दिल्यानंतर आयोजन कर्त्यांनी स्वतःची जाहीरात रंगवून लिहिताना . . श्री शिवाजी स्टेडीयम मधील “श्री”हा त्यांच्या जाहिरातीत पुसुन गेला आहे . . तसेच जे नाव शिल्लक आहे त्याचा ही रंग उडालेला आहे .. तरी श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम नावामधील हरवलेला “श्री” आम्हाला परत रंगवून द्यावा आणि यापुढे सामने आयोजित करणाऱ्यांना स्वतःची जाहिरात करत असताना स्टेडीयमच्या नाम फलकावर जाहिरात करता येणार नाही अशी अट घालून परवानगी द्यावी .
तसेच सध्या "छत्रपती शिवाजी स्टेडीयम" हा जो उल्लेख आढळून येत आहे तो बदलून "श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम" असा आदरपूर्वक उल्लेख करावा व लवकरात लवकर रंगकाम करून स्वच्छ सुंदर असा मनपाने नामफलक लावावा . हि नम्र विनंती .
सोबत जुना , नवा फोटो व सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेल्या चांगल्या बोर्डचा फोटो जोडत आहे आपला विश्वासु
गणेश शिवाजी तोडकर.
8983433555
असे त्यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.व प्रशासनाकडे पाठपुरावा देखील करणार आहेत.
